Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते,माजी मुख्यमंत्री डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

  *भावपूर्ण श्रध्दांजली* शिवसेनेचे ज्येष्ठ नेते,माजी मुख्यमंत्री डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ३.०२...

 *भावपूर्ण श्रध्दांजली*


शिवसेनेचे ज्येष्ठ नेते,माजी मुख्यमंत्री

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन



दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ३.०२ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सरांना वयाच्या ८६ व्या वर्षी

देवाज्ञा झाली.

दिनांक २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. 

अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.

माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष सरांवर दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार होतील.

 मे २०२३ मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती.

*ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो*

No comments