Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तीन गावठी कट्टे व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या आरोपीनां पोलिसांना घेतले ताब्यात

  तीन गावठी कट्टे व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या आरोपीनां पोलिसांनी घेतले ताब्यात  आठ लाख बेचाळीस हजार पाचशे रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत  चोप...

 तीन गावठी कट्टे व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या आरोपीनां पोलिसांनी घेतले ताब्यात 


आठ लाख बेचाळीस हजार पाचशे रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत 


चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई




चोपडा प्रतिनिधी 

संपादक : हेमकांत गायकवाड 

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अखत्यारित दिनांक २३/०२/२०२४ रोजी रात्री ०२.०० वाजता पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना एका गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की सत्रासेन मार्गे एक राखाडी रंगाची एरटीगा गाडी क्रमांक एम.एच.१२.आर एफ.१४९६ या गाडीत तीन इसम गावठी कट्टे (पिस्टल) घेवुन निघाले आहेत असे समजल्यावरुन रात्रगस्तचे पोलीस हवालदार शशीकांत पारधी,चालक पोहेकॉ.किरण धनगर होमगार्ड श्रावण तेली,होमगार्ड संजय चौधरी यांनी शिताफीने सापळा लावुन बुधगाव फाट्याजवळ थांबुन थोळ्याच वेळात सदर गाडी आल्याने गाडी थांबवुन त्यांची गाडीची झाडा झडती घेतली असता सदर गाडीत ३ गावठी कट्टे व ८ जिवंत काडतुस विना परवाना मिळुन आल्याने इसम नामे जफर रहिम शेख वय ३३ वर्ष रा.भाजीबाजार घोड नदी शिरुर ता.शिरुर जि.पुणे,तरबेज ताहिर शेख वय २९ वर्ष रा.सेंटर दवाखाना समोर रिव्हेनी कॉलनी शिरुर ता.शिरुर जि.पुणे,कलिम अब्दुल रहमान सैय्यद वय ३४ वर्ष यांचे वर चोपडा ग्रामीण पो.स्टे.सीसीटिएनएस गुरनं.३३/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व तिन्ही आरोपीनां अटक करण्यात असुन चोपडा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक कावेरी कमलाकर पोना.शशीकांत पारधी चालक पोहेकॉ.किरण धनगर होमगार्ड.श्रावण तेली,होमगार्ड.संजय चौधरी,सफौ.राजु महाजन,सफौ.देविदास ईशी,पोकॉ

प्रमोद पारधी,पोकॉ.मनेश गावीत,पोकॉ.विनोद पवार,पोकॉ.महेंद्र भिल,पोकॉ.संदिप निळे यांनी कारवाई कामी मदत केली आहे.सदर गुन्ह्याचा तपास सफौ,देविदास ईशी हे करीत आहे.

No comments