डाॅ.भाऊसाहेब देशमुख आर्ट अकॅडमीचे ललित कला केंद्र,चोपडा ला दोन बक्षीस भगिनी मंडळ, चोपडा येथील ललित कला केंद्रातील प्रमोद वारुळे (पारोळा) ए...
डाॅ.भाऊसाहेब देशमुख आर्ट अकॅडमीचे ललित कला केंद्र,चोपडा ला दोन बक्षीस
भगिनी मंडळ, चोपडा येथील ललित कला केंद्रातील प्रमोद वारुळे (पारोळा) ए.टी.डी.द्वितीय वर्ष या विद्यार्थ्यास डाॅ.भाऊसाहेब देशमुख आर्ट अकॅडमी 2024 अमरावती द्वारा आयोजित
चोपडा प्रतिनिधी
संपादक: हेमकांत गायकवाड
भगिनी मंडळ, चोपडा येथील ललित कला केंद्रातील प्रमोद वारुळे (पारोळा) ए.टी.डी.द्वितीय वर्ष या विद्यार्थ्यास डाॅ.भाऊसाहेब देशमुख आर्ट अकॅडमी 2024 अमरावती द्वारा आयोजित राज्यस्तरीय चित्रप्रदर्शनात जलरंग पारदर्शक पद्धतीतील व्यक्तीचित्रणाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व रोख 5000 रुपये असे बक्षीसाचे स्वरूप आहे.त्यासोबतच तिवरसिंग गोण्या पावरा (कुड्यापाणी) याला उत्तेजनार्थ बक्षीस रोख रक्कम 500 रुपये प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह मिळाले.वर्गप्रमुख प्रा.विनोद पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले संस्थेच्या अध्यक्षा पूनमताई गुजराथी,सहसचिव अश्विनीताई गुजराथी,उपप्राचार्य आशिष गुजराथी,प्राचार्य सुनील बारी,प्रा.विनोद पाटील,प्रा.संजय नेवे,भगवान बारी,अतुल अडावदकर,प्रवीण मानकरी व सर्व सदस्यांनी सहभागी 18 विद्यार्थ्यांसह बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत कौतुकाची थाप देऊन शुभेच्छा दिल्यात.

No comments