adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दुपारण्या भाकरी।

  दुपारण्या भाकरी।     मन्हा वाचा मान्ह हावु लेख उना लिखणार कोन हुई काई म्हाइत नही पण भाऊसोन पण  जुन्या आठवणी त्या आठवणी ज शेत आस वाट मी थोड...

 दुपारण्या भाकरी।    

मन्हा वाचा मान्ह हावु लेख उना लिखणार कोन हुई काई म्हाइत नही पण भाऊसोन पण  जुन्या आठवणी त्या आठवणी ज शेत आस वाट मी थोडा टाइमत तठेज वत्हु लिखणार ना गरा गरा आभार 

 


                            तीस पस्तीस वरीस पयले ट्रकटर ना एवढं वापर नही व्हता ,तवय बैल जोडीना लोखंडी नांगर चाले ,बठ्ठा कामे बैले वरच चालेत ,रातले मुककामी वावरमा राहणं पडे ,सुकरांनी चांदनी निघावर बैलेसले चराले सोडणं पडे ,आणि दिन निघणा पाहिले औते धुरावाई जायेत ,हातभर दिन वर उना की न्याऱ्या करिलेत ,मग औते धुरायसिंन सूर्य नारायण डोकावर ये तोवर औते चालेत ,नागरणा चाहूर हकळणारा मज्याना गाणे म्हणे त ,एखादा तमाशाना अर्धा उराधा वग म्हणेत ,दोन तीन बिधा वावर एक पहारमा हुई जाये ,तवय गावमा बराच खटला एकंदर राहेत ,घर भरेल वाटे ,३,  ४ भाऊ २ , ३  बहिणी ,धला ,धलली ,एखादा दोन भाचा भाची राहेत ,दुपार व्हवाना आत   धलला म्हणा किंवा मोठी सून किंवा कोणतीबी सून बाई औत वालासण्या दुपारण्या भाकरी गोया करिसन मोठं लोखंडणा तगारीमा रची लेत ,मग सालदारनि ,महीनदार ,घरणा भाऊ यासनी गिणती करिसन बठ्ठसण्या भाकरी सेत यांनी खात्री व्हयनि की मग टोपल चोभय करिसन डोकावर लेवान आणि बागी बागी वावरणं रस्ता धरना १५ ते २० मिनीतमा भाकरीवाली वावरमा भिडी जाये ,सूर्य नारायण तोवर डोकावर ई जाये ,झाडणा खाले भाकरी ठेयात की बाई औतवालासले आवाज दिदे , औते सुटणात की भाकरी लयेल बाई ,बुवा बैले चारे व ध्यान ठे ,औतवाला ,डीर खदनारा डालकामाईन आपला आपला भाजीना तांब्या ,भाकर बाधेल धुडकाना रंग देखीसन भाकर काडीसीन बठ्ठाजन जेवाले बसेत ,भाज्यासनी लेव देव व्हय ,कोणी काला मोडीसन फुरका मारिसीन जे ते कोणी भाजी भाकर लाई लाई खायेत ,एक बादली पाणिनी भरेल राये ,रबरणा गलास राहे ,जेवण व्हवा नंतर जो तो त्यांना त्यांना तांब्या ताटली धोइसन ताटलीमा पाणी पे ,मग भाकरना कपडा ताब्यामा ठी देत नइ तर त्या कपडामा ताटली तांब्या बंधी देत ,पण ते जे जेवण व्हय त्यांना आनंद ,मजा काही वालीच व्हती ,थोडासा लांब पाय करात की कारभारी म्हणेत चला बो धरा बैले त्यासले पाणी दाखडा आणि धुरावा औते सध्याकाय तीन पाटा वावर व्हवले पाहिजे ,,,जिरे रामा हो जी जी रे  जी ,हे रे असा आवाज एकाले भेटेत , आते बठ्ठ इसराणी वेळ उनी

No comments