ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर साहेबांनी महात्मा ज्योतिबा फु...
ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर साहेबांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित संबोधन करून ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
किरण पाटील मुक्ताईनगर प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमित्त मुक्ताईनगर पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक श्री राहुल बोरकर साहेब यांचे शुभहस्ते कांर्तीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी ज्ञानोदय मंडळ अध्यक्ष एस.ए.भोईसर, उपाध्यक्ष शरद महाजन,शे.भैया.शे.करीम, प्राचार्य डॉ.सोनवणे,सलीम मंत्री, अंतुर्ली औट पोस्ट चे अशोक जाधव, तालुका काँग्रेस अध्यक्ष दिनेश पाटील, अनिल वाडीले, ग्रंथपाल मधुकर वानखेडे, अनिल न्हावकर व मान्यवर उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर साहेबांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित संबोधन करून ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.





No comments