चोपडा शहरात सानेगुरुजी वसाहत भागातील मजिदजवळ सार्वजनिक ठिकाणी घटना मोबाईल मध्ये आय.पी.एल. ची क्रिकेट मॅच पहाण्यावरून वाद प्रतिनिधी चोपडा (स...
चोपडा शहरात सानेगुरुजी वसाहत भागातील मजिदजवळ सार्वजनिक ठिकाणी घटना
मोबाईल मध्ये आय.पी.एल. ची क्रिकेट मॅच पहाण्यावरून वाद
प्रतिनिधी चोपडा
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरातील सानेगुरुजी वसाहत भागातील मजिदजवळ सार्वजनिक ठिकाणी काही जण मोबाईलवर आय.पी.एल.ची क्रिकेट मॅच पाहत बसले होते यावरून संबंधीतांमध्ये वाद निर्माण झाला याबाबत अधिक माहिती अशी की शेख शाहरुख शेख शब्बीर वय २४ वर्ष व त्याचा मित्र हे चोपडा शहरात सानेगुरुजी वसाहत भागातील मजिदजवळ सार्वजनिक ठिकाणी तोहिद कुरेशी यांच्या घराजवळील मजिदजवळ त्यांचे मोबाईल मध्ये आय.पी.एल. ची क्रिकेट मॅच पाहत बसले होते. याबाबत तोहिद कुरेशी याने विचारणा केली की येथे काय करीत आहात या कारणावरुन आय.पी.एल. ची क्रिकेट मॅच मोबाईलवर पाहत असलेल्यांना तोहिद कुरेशी ने सांगितले व तो शाहरुख बोलला की तुम्ही येथुन तुमच्या घरी जा.त्यावर फिर्यादी शहारुख त्याला बोलला की, येथे तुला काय त्रास आहे. त्यावर आरोपी तोहिद कुरेशी याने फिर्यादीची शर्ट ची कॉलर पकडली व शिवीगाळ करु लागला त्यावेळी शाहरुख व मित्र नासीर हा भांडण सोडवत असतांना आरोपी ताहिद कुरेशी याने त्याचे मोबाईलवरुन त्याचे नातेवाईकांना फोन लावून सांगितले की, मला मजिद जवळ शाहरुख आणि नासिर हे मारत आहे. असे सांगितल्यावर काही वेळातच बबलू कुरेशी, शाहिद कुरेशी, हुसेन कुरेशी, मुजाहिद उर्फ मुज्जू कुरेशी, जुबेर कुरेशी, असे मित्र मंडळी जमवून आले य त्यांनी शाहरूख व मित्र नासिर यांना जमिनीवर पाडुन लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यावेळी आरोपी तोहिद कुरेशी याने लाकडी काठी आणून फिर्यादीच्या मानेवर, पाठीवर, व डाव्या हाताचे खांद्यावर काठीने मारहाण केली त्यावेळी आरोपींनी फिर्यादी शाहरुख व त्याचे मित्र नासिर यांना शिवीगाळ व चापटा बुक्क्यांनी मारहाण करुन दम दिला की, यापूढे जर मजिदजवळ येवून बसला तर तुला ठार मारु टाकु अशी धमकी दिली म्हणुन आरोपींन विरूद्ध चोपड़ा शहर पोस्टे CCTNS गुरनं. १६५/२०२४ भादवी कलम ३२४,३२३,१४३,१४७,१४९,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मधुकर साळवे चोपडा शहर पो.स्टे.यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ/ संतोष पारधी तपास करीत आहेत
No comments