adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वैजापूर वनक्षेत्र व चोपडा ग्रामीण पोलिसांची अवैध हातभट्टी व रसायन साठा करणाऱ्याच्या विरोधात संयुक्त कारवाईत केले उध्वस्त

  वैजापूर वनक्षेत्र व चोपडा ग्रामीण पोलिसांची अवैध हातभट्टी व रसायन साठा करणाऱ्याच्या विरोधात संयुक्त कारवाईत केले उध्वस्त  चोपडा प्रतिनिधी ...

 वैजापूर वनक्षेत्र व चोपडा ग्रामीण पोलिसांची अवैध हातभट्टी व रसायन साठा करणाऱ्याच्या विरोधात संयुक्त कारवाईत केले उध्वस्त 




चोपडा प्रतिनिधी 

(संपादक: हेमकांत गायकवाड)

आज रोजी गुप्तबातमी खाऱ्यापाडा शिवारात यावल वनविभागातील वैजापुर वनक्षेत्र अंतर्गत खाऱ्यापाडाव परिमंडळात कं.नं.२३८ मधील देवड़झाड परिसरात अवैद्य रित्या हातभट्टीची दारु भट्टी नष्ट करण्यात आली असुन,सदर कार्यवाहीत एकुण-३५ बॅरल,प्रति बैरल २०० लिटर प्रमाणे एकूण ७०००(सात हजार) लिटर रसायन (दारु) नष्ट करण्यात आले.सदरिल दारुची किंमत प्रति लिटर ३५ रु.प्रमाणे एकुण २४५००० रु.किंमतीचे रसायन(दारु) नष्ट करण्यात आली असुन,जप्त बॅरल जागेवरच जाळून नष्ट केले.व अज्ञात आरोपी विरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे हड्या पावरा,गोरख पावरा,गुजाऱ्या बारेला,यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम ६५ (फ) चा भंग झाल्याने करण्यात आली.सदरची कार्यवाही समाधान सोनवणे,वनक्षेत्रपाल वैजापुर कावेरी कमलाकर,पोलिस निरिक्षक (ग्रामीण)चोपडा,खलील याकुब शेख,वनपाल खाऱ्यापाडाव,आश्विनी धात्रक,वनपाल बोरअजंटी,अर्चना गवते,वनपाल कर्जाणा,आय.एस.तडवी,वनपाल वैजापुर तसेच वनरक्षक सी.आर.कोळी,वंदना बारेला,संदिप ठाकरे,नोकेश बारेला,हुकाऱ्या बारेला,हेमलता बारेला सुनिल भोई,संदिप भोई,भारसिंग बारेला,विजय शिरसाठ,बाजीराव बारेला,ज्योती बारेला,धनाबाई बारेला,तसेच पोलीस नाईक शशिकांत पारधी,पो.कॉ.प्रमोद पारधी,पो.कॉ.वसंत कोळी,मनेश गावित तसेच वनमजुर एकनाथ ढिवरे,काशिनाथ कोळी,सतिष पाटील,अरुण पाटील,लोटन सोनवणे व वनसेवक सुभाष पावरा,रोहन पावरा,लक्ष्मण बारेला,सुभाष बारेला,सुंदरलाल बारेला,जगदिश पावरा,रामजी बारेला,प्रताप कोकणी,सुशिल कोळी,भागवत पाटील,निवृत्ती पाटील,निखिल पाटील असे एकुण ४० वन अधिकारी व कर्मचारी यांच्या समुहाने सदरिल कार्यवाही यशस्वी रित्या केली.

No comments