adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ३४ वा सामना

  इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ३४ वा सामना  आयपीएल २०२४ चा ३४ वा सामना शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला...

 इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ३४ वा सामना 

आयपीएल २०२४ चा ३४ वा सामना शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. 



दिल्ली क्रीडा जगत वृत्तसंस्था 
(संपादक हेमकांत गायकवाड)

आयपीएल २०२४ चा ३४ वा सामना शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या हाय व्होल्टेज सामन्यात लखनौने चेन्नईचा ८ विकेट्सने पराभव केला. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात धोनी ब्रिगेडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौने ४चेंडू आणि ८ गडी बाकी असताना सहज सामना जिंकला. लखनौ ५ सामन्यात ४ विजयांसह ५ व्या स्थानावर आहे आणि चेन्नई समान संख्येने सामने आणि समान विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईला रन रेटचा फायदा मिळाला आहे.

(IPL २०२४) लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (LSG vs CSK) यांच्यात लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जचा आठ गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी, लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत ६ गडी गमावून १७६ धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जसाठी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने RE ५६ नाबाद धावांची शानदार खेळी खेळली. लखनौ सुपर जायंट्सकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने अवघ्या १९ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. लखनऊ सुपर जायंट्ससाठी सलामीवीर केएल राहुलने ८२ धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. चेन्नई सुपर किंग्जसाठी मुस्तफिझूर रहमान आणि मथिशा पाथिराना यांनी पत्रोक्ती एक विकेट घेतली





No comments