adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उमेदवारांच्या खर्चावर राहणार निवडणूक आयोगाची नजर, अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

  उमेदवारांच्या खर्चावर राहणार निवडणूक आयोगाची नजर, अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या निवडणु...

  उमेदवारांच्या खर्चावर राहणार निवडणूक आयोगाची नजर, अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न 


लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम १८ एप्रिल पासून सुरू होणार 

चोपडा प्रतिनिधी 

(संपादक: हेमकांत गायकवाड)

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम १८ एप्रिल पासून सुरू होणार आहे. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवाराने केलेल्या खर्चावर निवडणूक आयोगाचे लक्ष असणार आहे. या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध समित्या वेळोवेळी उमेदवाराने केलेल्या खर्चावर नजर ठेवणार असून दररोज प्रपत्र क्रमांक दहा मध्ये केलेल्या खर्चाची माहिती वरिष्ठ कार्यालयास कळवली जाणार आहे .



    चोपडा तहसील कार्यालयात रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत कार्यरत असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या आढावा बैठकीत अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, सहाय्यक खर्च पर्यवेक्षक अशोक शर्मा ,०३ जळगाव लोकसभा मतदारसंघ समन्वयक राजेंद्र खैरनार जिल्हा नोडाल अधिकारी विनोद चावरिया, जिल्हा खर्च समन्वयक नोडल अधिकारी सी पी वानखेडे तथा फ्लाईंग सर्विलंस टीम, व्हिडिओ सर्विलन्स टीम, व्हिडिओ व्हीविंग टीम, स्टॅटिक्स सर्विलांस टीम चे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

            यावेळी उमेदवाराने प्रचारादरम्यान किती खर्च केला खर्चाची मर्यादा ओलांडली आहे का आचारसंहितेचा भंग झाला आहे का आदी गोष्टी तपासण्याचे निर्देश देण्यात आले. सभा, रॅली बाबत परवानगी साठी एक खिडकी कक्ष स्थापन केला आहे. उमेदवाराला सर्व परवानगी एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी दक्ष असण्याच्या सूचना देण्यात आल्या. तालुक्यातील वैजापूर, उमर्टी , सत्रासेन अशा आंतरराज्य सीमा स्थानी असलेल्या चेक पोस्टवर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी दक्ष रहावे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या जबाबदाऱ्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश यावेळी उपस्थिताना देण्यात आले.


No comments