चिनावल येथे एका संपादकावर प्राण घातक हल्ला:अज्ञात हल्लेखोराच्या विरुध्द गुन्हा दाखल चिनावल कोचूर रस्त्यावरील स्मशानभूमी जवळ त्यांच्यावर अज...
चिनावल येथे एका संपादकावर प्राण घातक हल्ला:अज्ञात हल्लेखोराच्या विरुध्द गुन्हा दाखल
चिनावल कोचूर रस्त्यावरील स्मशानभूमी जवळ त्यांच्यावर अज्ञात बाईक स्वारांनी प्राणघातक हल्ला
सावदा/प्रतिनिधी मुबारक तडवी
( संपादक :हेमकांत गायकवाड)
सावदा :- येथून जवळच असलेल्या चिनावल येथे
आवाज परिवर्तनाचा या साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक भुसावळ येथे होणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरयांच्या सभेसाठी गाव खेड्यातील बैठक आटोपून,बैठका घेत असतातना चिनावल येथील बैठक आटोपून दिनांक दोन रोजी रात्री १०-३० वाजेच्या सुमारास सुझुकी इको एम एच १९ ए एक्स १४३० या चार चाकी वाहनाने परत येत असताना चिनावल कोचूर रस्त्यावरील स्मशानभूमी जवळ त्यांच्यावर अज्ञात बाईक स्वारांनी प्राणघातक हल्ला केला.अशी फिर्याद जखमी आवाज परिवर्तनाचा वृत्तपत्राचे संपादक शिक्षक व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आत्माराम तायडे रा.सावदा ता.रावेर यांनी आज शुक्रवार दि.३ मे रोजी सावदा पोलीस ठाण्यात दिली.असता अज्ञात हल्लेखोराच्या विरुध्द गुरनं.८६/२०२४ भादवी कलम २३२,३२४,३४ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील घटनामुळे सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावखेड्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसून येते.गुन्हेगारी पार्श्वभूमी बिळातून डोके वर काढू लागलीय पत्त्यांचा क्लब वरील सशस्त्रधारी दरोडा जबरी चोरी खुनाच्या घटना मध्ये वाढ झाली आहे ?गुन्हेगारी वृत्ती वाढीस येऊ लागलीये? गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही?तरी पोलिसांनी लवकरच तपास चक्र फिरवून अशा हल्लेखोरांना अटक करावी.अशी मागणी जोर धरू लागली आहे.

No comments