राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नोव्हेंबर मध्ये शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे तिसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नोव्हेंबर मध्ये होणार आ...
राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नोव्हेंबर मध्ये
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे तिसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नोव्हेंबर मध्ये होणार आळंदी देवाची या ठिकाणी.
किरण पाटील :मुक्ताईनगर प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या पुणे जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांची मीटिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १९ मे रोजी सी. एस. स्वाती रुणवाल अँड राजकुमार कांकरिया अल्टिमा बिझनेस सेंटर कात्रज कोंढवा रोड, पुणे या ठिकाण नुकतीच उत्साहात संपन्न झाली.
याप्रसंगी फाउंडेशनचे राज्य समन्वयक प्रा.डॉ. राजकुमार कांकरिया यांनी प्रास्ताविक सादर केले व फाउंडेशनचे आतापर्यंतचे कार्य विशद केले त्यानंतर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी फाउंडेशनचे आतापर्यंत झालेले संमेलन झालेले विविध कार्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा केली. तसेच याप्रसंगी प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया यांचा स्मृतिचिन्ह व नवीन वर्षाची दिनदर्शिका भेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी पूर्वी झूम मीटिंगमध्ये प्रा. सुनील धनगर यांच्या नावाची घोषणा केलेली होती त्यांना या मीटिंगमध्ये डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी निवड पत्र व नवीन वर्षाची दिनदर्शिका भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुढील तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन आळंदी देवाची जिल्हा पुणे या ठिकाणी नोव्हेंबर मध्ये आयोजित करण्यात येईल अशी सुद्धा घोषणा त्यांनी याप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकारी मान्यवरांच्या सहकार्याने केली. याप्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर ,राज्य समन्वयक प्रा.डॉ. राजकुमार कांकरिया, राज्य सल्लागार बाळकृष्ण अमृतकर ,पुणे जिल्हा समन्वयक रामचंद्र गुरव तसेच बुलढाणा जिल्हा समन्वयक पांडुरंग दैवज्ञ साहेब ,बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पूजाताई खेते ,बुलढाणा जिल्हा सदस्य बाळूभाऊ इटणारे ,पुणे जिल्हा सदस्य जगन्नाथ बुडूखले, गुरुजी तसेच सी.एस. स्वातीताई रूणवाल त्याचप्रमाणे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुनील धनगर सर ,फाउंडेशनचे कार्यकारणी सदस्य सुनीलभाऊ मुंधोकार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी शंका समाधान व सूचना या विषयावर आपले विचार मांडलेत तर शेवटी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. सुनील धनगर सर यांनी या सभेचे आभार प्रदर्शन केले याप्रसंगी प्रा. राजकुमार कांकरिया यांनी सर्वांनाच स्नेह भोजनाचा आनंद सुध्दा दिला.
No comments