शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाईची करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता मुरलीधर परदेशी १५ मे २०२३ रोजी शासनाने ...
शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाईची करण्याची मागणी
१५ मे २०२३ रोजी शासनाने अति तातडीचा आदेश काढून ३१ मे २०२३ रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गावातील सामाजिक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या दोन कर्तबगार महिलांना अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करायचे निर्देश दिले होते
नगरदेवळा, ता. पाचोरा प्रतिनिधी
(संपादक:हेमकांत गायकवाड)
शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आखातवाडे येथील ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून १५ मे २०२३ रोजी शासनाने अति तातडीचा आदेश काढून ३१ मे २०२३ रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गावातील सामाजिक क्षेत्रात ,चांगले काम करणाऱ्या दोन कर्तबगार महिलांना अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करायचे निर्देश दिले होते. तर हा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात ग्रामस्थांसमोर घ्यायचा होता. परंतु आखतवाडे ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक यांनी हा कार्यक्रम घेतलाच नाही, तसेच गावातील दोन कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित ही केले नाही. जर शासन अति तातडीचा आदेश काढत असेल आणि त्याचे पालन ग्रामसेवक करत नसतील तर हा शासकीय आदेशाचे उल्लंघनच आहे. अशा ग्रामसेवकावर कारवाई करण्याबाबत येथील माहिती अधिकार कार्यकर्ता मुरलीधर परदेशी यांनी जिल्हा परिषदेच्या उप-मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. संबंधित तक्रार ही जिल्हा परिषदेतर्फे फेब्रुवारी महिन्यात पाचोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे वर्ग केली आहे. परंतु, गटविकास अधिकाऱ्यांनी अद्यापही ग्रामसेवकांवर कोणतीच कारवाई केलेली नाही.




No comments