adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विरवाडे येथे प्रशिक बुद्ध विहार लोकार्पण सोहळा संपन्न

  विरवाडे येथे प्रशिक बुद्ध विहार लोकार्पण सोहळा संपन्न वैशाख पौर्णिमा तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशिक बुद्ध विहा...

 विरवाडे येथे प्रशिक बुद्ध विहार लोकार्पण सोहळा संपन्न


वैशाख पौर्णिमा तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशिक बुद्ध विहाराचे लोकार्पण सोहळा व उदघाटन

चोपडा प्रतिनिधी

(संपादक:हेमकांत गायकवाड)

   विरवाडे ता.चोपडा येथे वैशाख पौर्णिमा तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशिक बुद्ध विहाराचे लोकार्पण सोहळा व उदघाटन आत्माराम गोरख माळके माजी सभापती पंचायत समिती चोपडा यांच्या हस्ते करण्यात आले.


       तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मुर्ती दान दाते दिनेश शिवदास कापडणे व बोधीसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मुर्ती दान दाते प्रविण सुकदेव सैदाणे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना त्रिशरण,पंचशील, बुद्ध वंदना श्रामणेर संघ प्रमुख सारीपुत्त तथा बापूराव गिरधर वाणे यांच्या २५ भन्ते यांनी विधवित मंगलमय वातावरणात सुत्रपठण करून करण्यांत आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भन्ते कर्मानंद तथा भरत भिमराव शिरसाठ शहर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी केले.

      उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वसंत लोखंडे केंद्रिय शिक्षक जिल्हा उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जळगांव पूर्व हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सुशिलकुमार हिवाळे जिल्हा सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा जळगांव पूर्व, सारीपुत्त बापूराव वाणे,दशरथ संध्यान,हितेंद्र बिरबल मोरे केंद्रिय शिक्षक,अशोक राजाराम बाविस्कर जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,संतोष भिवसन अहिरे सामाजिक कार्यकर्ते, विशाल आत्माराम माळके सरंपच विरवाडे, गुलाबराव जीवनराव सुर्यवंशी ग्राम विकास अधिकारी विरवाडे,शालीग्राम व्यंकट करंदीकर ,महारू कोळी पोलिस पाटील विरवाडे,राजेंद्र पारे बौद्ध साहित्यिक,भूरसिंग बाविस्कर, गंगाराम कुवर,जानकीराम सपकाळे,दिनेश कापडणे ,प्रविण सैदाणे,रमेश सोनवणे हे उपस्थित होते. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनोद युवराज शिरसाठ ग्रा.प.सदस्य, गोकुळ छन्नू शिरसाठ,गौतम भिमराव बाविस्कर,नाना उखर्डू वाघ,संदिप रावण सैदाणे,दिनकर जगन्नाथ बाविस्कर,नवल शिवराम शिरसाठ,सुपडू रतन गोलाईत, लक्ष्मण छन्नू शिरसाठ,सुरेश आनंदा सोनवणे,सुनिल युवराज शिरसाठ,कैलास जगन्नाथ शिरसाठ,विजय आनंदा सोनवणे,राजेंद्र भिमराव शिरसाठ,जितेंद्र युवराज शिरसाठ आदी बौद्ध उपासक उपासिका यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सुदाम रामदास करनकाळ माजी तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चोपडा यांनी केले.

No comments