मौलवीगंज चौकातील एका पानाचे दुकानवर पंटरला पाठवुन३०,०००/- रुपये लाचेची मागणी आझादनगर पोलीस स्टेशनचे डी.बी. पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अझरुददी...
मौलवीगंज चौकातील एका पानाचे दुकानवर पंटरला पाठवुन३०,०००/- रुपये लाचेची मागणी
आझादनगर पोलीस स्टेशनचे डी.बी. पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख जाळ्यात
मौलवीगंज चौकातील एका पानाचे दुकानवर पंटरला पाठवुन तक्रारदार यांचेकडे ३०,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती
धुळे प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मौलवीगंज चौकातील एका पानाचे दुकानवर पंटरला पाठवुन तक्रारदार यांना तुम्हाला पानाच दुकान चालवायचे असेल व तुमच्यावर गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल करायचा नसेल व खाजगी वाहनातुन जनावरांची वाहतुक करीत असल्याचे समजले असुन गुन्हा दाखल होवू नये यासाठी तक्रारदार यांचेकडे ३०,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती
याबाबत अधिक माहिती अशी की आझादनगर पोलीस स्टेशनचे डी.बी. पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख यांनी आझाद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील मौलवीगंज चौकातील एका पानाचे दुकानवर पंटर अब्दुल बासित अन्सारी याला पाठवुन तक्रारदार यांना तुम्हाला पानाच दुकान चालवायचे असेल व तुमच्यावर गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल करायचा नसेल व खाजगी वाहनातुन जनावरांची वाहतुक करीत असल्याचे समजले असुन गुन्हा दाखल होवू नये यासाठी तक्रारदार यांचेकडे ३०,०००/- रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती
पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख व पंटर अब्दुल बासित अन्सारी यांनी तक्रारदार यांना दि. ०४.०५.२०२४ रोजी पारोळा रोड येथे बोलावुन तक्रारदार यांच्याकडुन १७,०००/- रुपये घेतले होते. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख यांनी दि. ०५.०५.२०२४ रोजी तक्रारदार यांच्या मोबाईलवर फोन करुन उर्वरित १३,०००/- रुपये पंटर बासित अन्सारी यांच्याजवळ देण्यास सांगितले असल्याची तक्रारदार दि. ०६.०५.२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात समक्ष येवुन तक्रार दिली होती
सदरील तक्रारीची दि. ०६.०५.२०२४ रोजी पडताळणी करण्यात आली असून पडताळणी दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोडीअंती १२,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम पंटर अब्दुल बासित अन्सारी यांच्याकडेस देण्यास सांगुन आज दि.. ०७. ०५.२०२४ रोजी पंटर अब्दल बासित अन्सारी याने मौलवीगंज चौकात तक्रारदार यांच्या पानदुकानासमोर तक्रारदार यांच्याकडुन सदर लाचेची रक्कम स्विकारल्याने पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख व पंटर अब्दुल बासित अन्सारी यांना ताब्यात घेवुन आले असुन त्यांचे विरुध्द आझादनगर पो.स्टे. जि. धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७, ७अ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
आझादनगर पोलीस स्टेशन धुळे येथील डी.बी. पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख यांनी तक्रारदार यांचेकडुन ३०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन यापुर्वी १७,०००/- रुपये स्विकारुन तडजोडी अंती उर्वरित १२,०००/- रुपये लाचेची रक्कम पंटर अब्दुल बासित अन्सारी यांचे हस्ते स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक श्री. अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रविण मोरे, प्रशांत बागुल, रामदास बारेला, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.
सदरील कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी व वाचक पोलीस उप अधिक्षक मा. श्री. नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.


No comments