रेल्वे तिकीट काढल्यानंतरही प्रवाशांना भरावा लागला ८१ हजारांचा दंड योग्य कारणाशिवाय साखळी ओढणे हा गुन्हा आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांना क...
रेल्वे तिकीट काढल्यानंतरही प्रवाशांना भरावा लागला ८१ हजारांचा दंड
योग्य कारणाशिवाय साखळी ओढणे हा गुन्हा आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांना कोणत्याही कारणाशिवाय अलार्म चेन ओढू नये अशी विनंती केली आहे
नवी दिल्ली: (वृत्तसंस्था)
(संपादक: हेमकांत गायकवाड)
ट्रेनमध्ये प्रवास करताना एक चूक प्रवाशांना महागात पडली. या सर्वांना भारतीय रेल्वेने अटक केली आहे. त्यांच्याकडे तिकीटं होती, पण स्टेशनवर उतरण्याऐवजी त्यांना आपापल्या गावाजवळ किंवा घराजवळ उतरायचं होतं. त्यासाठी चेन पुलिंग करण्यात आले. यामुळे त्यांच्याकडून रेल्वेने मोठा दंड वसूल केला. उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागात १ एप्रिल ते २१ मे २०२४ पर्यंत पुरेशा कारणाशिवाय अलार्म चेन ओढण्याची ३३६ प्रकरणे नोंदवली गेली, असुन ज्यामध्ये ३३५ लोकांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्याकडून रेल्वे कायद्याच्या विविध कलमांतर्गत ८१५७५ रुपये दंड वसूल करण्यात आला होता या प्रवाशांना आपल्या घराजवळ किंवा गावाजवळ ट्रेन थांबवून खाली उतरायचे होते. परंतु योग्य कारणाशिवाय साखळी ओढणे हा गुन्हा आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांना कोणत्याही कारणाशिवाय अलार्म चेन ओढू नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असते. तर ट्रेनही वेळेवर धावत नाही. याशिवाय चेन पुलिंगमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा चुकते आणि आजारी व्यक्तींना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. रेल्वे कायद्यात विनाकारण चेन पुलिंग केल्यास ६ महिने ते १ वर्षाचा कारावास आणि १००० रुपये दंडाची तरतूद आहे.
No comments