adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विठ्ठल रुक्मिणीचे मातेचे पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरु होणार

गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणीचे मातेचे पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरु होणार विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरातील संवर्धन आण...

गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणीचे मातेचे पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरु होणार


विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरातील संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम सुरु असल्यामुळे १५ मार्च पासून पदस्पर्श दर्शन बंद होते

प्रतिनिधी :पंढरपूर

(संपादक: हेमकांत गायकवाड)

 समस्त ह.भ.प.वारकरी बंधू भगिनीन साठी आनंदाची बातमी असुन दि. २ जून पासून गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणीचे मातेचे पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरु होणार असल्याचे सदरील माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दिली असून. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरातील संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम सुरु असल्यामुळे दि .१५ मार्च पासून पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते. तरी आता आषाढी वारी येत असल्याने मंदिरातील पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरु करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.या बाबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराजांच्या अध्यक्षतेसाठी नुकतीच मंदिर समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली या वेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित ३० टक्के कामासाठी वेळ लागणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले असून येत्या २ जून पासून भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. आषाढी यात्रे निमित्त ७ जुलै पासून देवदर्शन २४ तास सुरु राहणार आहे.

No comments