रुग्णांना रुग्णालयातील औषधी दुकानातून औषधी घेणेसाठी आग्रह करू नये!! माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांच्या मागणीस यश. ...
रुग्णांना रुग्णालयातील औषधी दुकानातून औषधी घेणेसाठी आग्रह करू नये!!
माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांच्या मागणीस यश.

सामाजिक कार्यकर्ते
भगवान चौधरी
प्रतिनिधी:चोपडा
(संपादक: हेमकांत गायकवाड)
अन्न व औषध प्रशासन विभाग यांचे 2022 चे परिपत्रकानुसार सर्व खासगी हॉस्पिटलानी आपल्या दर्शनी भागात रुगणालयतील रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषधी विक्रेत्याकडून औषधी खरेदी करू शकतात
याबाबत वृत्त असे कि,महिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. भगवान चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत अर्जाद्वारे मागणी केली होती. त्यांच्या मागणीप्रमाणे अन्न व औषध प्रशासन विभाग यांचे 2022 चे परिपत्रकानुसार सर्व खासगी हॉस्पिटलानी आपल्या दर्शनी भागात रुगणालयतील रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषधी विक्रेत्याकडून औषधी खरेदी करू शकतात आशा आशयाचे फलक लावणे क्रमप्राप्त होते. परंतु बहुतांश हॉस्पिटलमध्ये अशा आशयाचे फलक दिसत नव्हते त्याअनुषंगाने भगवान चौधरी यांनी ही बाब जिल्हाधिकारी जळगाव यांच्या निदर्शनास आणून दिली,जिल्हाधिकारी कार्यालयाने या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक ना याबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक यांनी स्वतंत्र पत्रक काढून जिल्हयातील सर्व खासगी हॉस्पिटलमध्ये यापुढे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक यांनी कोणत्याही परवानाधारक विक्रेत्याकडून औषधी खरेदी करावी असे फलक दर्शनी भागात लावावेत अन्यथा आपणावर अन्न व औषद प्रशासन यांचे पत्रकानुसार नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सर्व खासगी हॉस्पिटलमध्ये असे पत्रक लावलेलं दिसत असून याचा सामान्य रुग्णांची होणारी लूट थांबण्यास नक्कीच हातभार लागेल.
No comments