adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गृप ग्रामपंचायत वडती चे ६५ व्या वर्षात पदार्पण

  गृप ग्रामपंचायत वडती चे ६५ व्या वर्षात पदार्पण दिनांक १६ जून १९६० या दिवशी वडती गृप ग्रामपंचायत ची स्थापना झाली यामध्ये वडती सहित बोरखेडा ...

 गृप ग्रामपंचायत वडती चे ६५ व्या वर्षात पदार्पण

दिनांक १६ जून १९६० या दिवशी वडती गृप ग्रामपंचायत ची स्थापना झाली यामध्ये वडती सहित बोरखेडा विष्णापूर व नरवाडे या गावांच्या समावेश होता


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- चोपडा

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

वडती तालुका चोपडा येथील गृप ग्रामपंचायतचे आज ६५ व्या वर्षात पदार्पण होत आहे दिनांक १६ जून १९६० या दिवशी वडती गृप ग्रामपंचायत ची स्थापना झाली यामध्ये वडती सहित बोरखेडा विष्णापूर व नरवाडे या गावांच्या समावेश होता वडती चे प्रथम सरपंच होण्याच्या बहुमान शहाबाज खा जमशेर खा तडवी यांना जातो सन १९६० ते १९६४ पर्यंत ते वाढते गावाचे प्रथम सरपंच पदी विराजमान होते तदनंतर १९६२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते व जळगाव जिल्हा आरोग्य समितीमध्ये ते सदस्य म्हणून कार्यरत होते तर नंतर १९६४ ते १९६८ या कार्यकाळात किसान शंकर धनगर यांनी दुसरे सरपंच पद म्हणून कार्यभार सांभाळला सन १९६८ ते सन १९७३ या कार्यकाळात श्री हरिचंद्र किसन धनगर यांनी तिसरे सरपंच म्हणून कार्य पार सांभाळला सन १९७३ ते १९७८ पर्यंत श्री अंकुश बुधा धनगर चौथे सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला सन १९७८ ते सन १९८३ पाचवे सरपंच म्हणून पुन्हा हरिचंद्र किसन धनगर यांची निवड निवड झाली सन १९८३ ते सन १९८८ या कार्यकाळात सहावे सरपंच म्हणून पुन्हा अंकुश बुधा धनगर यांनी कार्यभार सांभाळला सन १९८८ ते सन १९९३ सातवे सरपंच म्हणून पुन्हा हरिचंद्र किसन धनगर यांना संधी मिळाली सन १९९३ ते सन १९९८ या कार्यकाळात श्री मगन छगन धनगर यांनी आठवे सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला सन १९९८ ते सन २००३ या कार्यकाळात नववे सरपंच म्हणून श्री देविदास हरिश्चंद्र धनगर यांची निवड करण्यात आली सन २००३ ते २००८ या कार्यकाळात प्रथमच अनुसूचित जमातीसाठी सरपंच पद राखीव झाल्यामुळे श्री पुंडलिक भागवत कोळी यांनी गावाचे दहावे सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला सन २००८ ते सन २०१३ या पाच वर्षाच्या कार्यकाळात श्री सुभाष कन्यालाल मराठे श्री खुशाल भास्कर महाजन व अलका सुरेश पाटील बोरखेडे या तिघांनी सरपंच पद भूषविले सन २०१३ ते सन २०१८ या कार्यकाळात १४ वे सरपंच म्हणून मीनाक्षी राजेंद्र धनगर यांनी कार्यभार सांभाळला सन २०१८ ते सन २०२३ हा कार्यकाळ पुन्हा अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने मनीषा संजय भिल यांनी सरपंच पदाची धुरा सांभाळली सन २०२४ ते २९ या कार्यकाळात सरपंचपद सर्वसाधारण झाल्यामुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत श्री देविदास हरिश्चंद्र धनगर यांनी विजय संपादन करून सरपंच पदाची सूत्रे आधी घेतली आहेत गावातील सरपंच पदाच्या तीन वेळा बहुमान मिळवणारे हरिचंद्र किसन धनगर हे एकमेव आहेत त्यानंतर श्री अंकुश बुधा धनगर हे देखील दोन वेळा सरपंच झालेले आहेत आणि आता देविदास हरिचंद्र धनगर यांना दुसऱ्यांदा सरपंच होण्याच्या बहुमान मिळालेला आहे सन १९९३ पासून विष्णापूर व नरवाडे येथे स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाल्यामुळे फक्त आता बोरखेडे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट आहे अलकाबाई सुरेश पाटील यांना सर्वप्रथम महिला सरपंच पद भूषविण्याच्या बहुमान मिळालेला आहे तर खंडू दलपत पाटील व बसवराज खंडू पाटील या दोघं बाप बेटांना उपसरपंच पद भूषवण्याची संधी लाभलेली आहे याव्यतिरिक्त नरवाडे येथील मयाराम धनगर व आत्माराम शंकर धनगर तसेच बोरखडे येथील छगन वामन पाटील सुरेश मयाराम पाटील खंडू दलपत पाटील बस राज खंडू पाटील अरुण शिवाजी पाटील हिरालाल पाटील यांना उपसरपंच पदाची संधी मिळाली तसेच वडती मधून शफी रसूल पिंजारी लतीफ मेहबूब पिंजारी श्री नारायण सुखा कोळी शिवाजी सोनू धनगर सुरेखा लालचंद कोळी कमल राजेंद्र कोळी लताबाई साहेब धनगर यांना देखील उपसरपंच होण्याच्या बहुमान मिळालेला आहे सुपडाबाई सुका कोळी यांना वडती ग्रामपंचायत अंतर्गत सर्वप्रथम महिला ग्रामपंचायत सदस्य होण्याच्या बहुमान मिळालेला आहे अशी आपली ग्रुप ग्रामपंचायत वडती तालुका चोपडा यांच्या आज एक प्रकारे ६४ वा वाढदिवस असून ६५ व्या वर्षात पदार्पण होत आहे तरी एक नागरिक म्हणून माझी वाढदिवस साजरा करण्याची जबाबदारी मी समजतो व पुन्हा गावाच्या विकासासाठी भरभराटीसाठी व समृद्धीसाठी ग्रामपंचायतला ६४ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो शुभेच्छुक जयराम कोळी पत्रकार वडती तालुका चोपडा मोबाईल नंबर ९९६०१ १२९०४ 

No comments