निकृष्ट बांधकाम करुण उभा केलेला जलकुंभ कोसळल्या प्रकरणी दोषींवर कारवाई करा-प्रशांत डिक्कर. नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- बुलढाणा अमोल बा...
निकृष्ट बांधकाम करुण उभा केलेला जलकुंभ कोसळल्या प्रकरणी दोषींवर कारवाई करा-प्रशांत डिक्कर.
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- बुलढाणा अमोल बावस्कार
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
संग्रामपूर/तालुक्यातील आदिवासी भागातील चिचारी येथे जल जिवन मिशन अंतर्गत १ कोटी ७५ लाख रुपयांच्या मंंजुर योजनेतुन १ लाख ५० हजार लिटर क्षमतेची गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी निकृष्ट बांधकामातुन उभी केलेली टाकी कोलमडून पडल्या प्रकरणी दोषींवर कारवाई करा अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी कार्यकारी अभियंता जि.प.बुलडाणा यांचेकडे निवेदनातुन केली आहे. चिचारी गावातील टाकिचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे ठेकेदारांना अनेक वेळा कल्पना देऊनही त्यांनी दुर्लक्षित केले.
या बांधकावर संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारांसोबत संगणमत केल्याने बांधकामात चांगलाच घोळ केला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे टाकीत पाणी पोहचण्या अगोदरच हि घटना घडली आहे. तसेच आदिवासी भागातील जनतेच्या जिवनाशी निगडित असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकासाठी निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्याने टाकी कोसळली आहे. घटना रात्रीच्या वेळी घडल्याने जिवितहानी झाली नाही. पण सामान्य आदिवासी लोकांच्या जिवनाशी अधिकारी व ठेकेदारांनी हा खेळ खेळला आहे. अशा दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा दिरंगाई केल्यास तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर व चिचारी ग्रामवासियांनी उपविभागीय अभियंता जि.प.बांधकाम विभाग खामगाव यांच्या मार्फत कार्यकारी अभियंता बुलढाणा यांना निवेदनातुन दिला आहे.या निवेदनावर रामकृष्ण गावंडे, हरिष केदार, जाबीर केदार, नसिब सुरत्ने, रमजान केदार सह कार्यकर्ते उपस्थित होते..




No comments