adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

इंजि. कोमल तायडे यांच्यासह सहकार्यांच्या आंदोलनास यश.

  इंजि. कोमल तायडे यांच्यासह सहकार्यांच्या आंदोलनास यश. दिवस-रात्र एक करून विद्यार्थ्यांनी कष्ट करून नीट परीक्षा दिली होती. उज्वल भविष्याचे ...

 इंजि. कोमल तायडे यांच्यासह सहकार्यांच्या आंदोलनास यश.

दिवस-रात्र एक करून विद्यार्थ्यांनी कष्ट करून नीट परीक्षा दिली होती. उज्वल भविष्याचे स्वप्न पाहणार्‍या या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत झालेल्या गैर व्यवहाराने कुठेतरी फटका बसला. 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- अमोल बावस्कार मलकापूर

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

अखेर शासनाने नीट परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे मान्य करून ग्रेस मार्क मिळालेल्या त्या १५६३ विद्यार्थ्यांचे स्कोअरकार्ड रद्द केले जातील किंवा त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल, असे शासनाने कोर्टाला सांगितले असून इंजि.कोमलताई तायडे व सहकार्‍यांच्या आंदोलनाला यश असून यामुळे विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यावश्यक असलेल्या नीट स्पर्धा परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे देशपातळीवरील विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. यामुळे या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष इंजि.कोमलताई सचिन तायडे यांनी जिल्हाभर विद्यार्थी व शिक्षकांसह या विषयासाठी आंदोलने केली. तसेच तात्काळ या गैरव्यवहाराची चौकशी करावी यासाठी शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. या आंदोलनात त्यांचे समवेत मलकापूरचे युवानेते शुभम लाहुडकर, फोनिक्स कोचिंग क्लासेसचे प्रा.अमोल पाटील सर, मोरे सर आदींसह अनेकांनीही सहभाग घेतला होता. त्यांच्या या आंदोलनाला व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घेतलेल्या भूमिकेला यश मिळाले असून शासनाने नीट परीक्षेत ग्रेस मार्क्स मिळालेल्या १५६३ विद्यार्थ्यांचे स्कोअरकार्ड रद्द केले जातील किंवा त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिल्या जाईल असे कोर्टात सांगितल्याने अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

दिवस-रात्र एक करून विद्यार्थ्यांनी कष्ट करून नीट परीक्षा दिली होती. उज्वल भविष्याचे स्वप्न पाहणार्‍या या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत झालेल्या गैर व्यवहाराने कुठेतरी फटका बसला. देश पातळीवर होणार्‍या या अशा परीक्षेतही गैरव्यवहार होत असल्याने शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. यामुळे शासनाने याबाबत कसून चौकशी करणे गरजेचे होते. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अशा प्रकारचा गैरव्यवहार पुन्हा होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी.

-इंजि. सौ.कोमलताई सचिन तायडे

जिल्हा उपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड

No comments