माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ११ऑगस्ट रोजी होणाऱ्या मेळाव्यासाठी बैठक पद्मालय येथे संपन्न नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युर...
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ११ऑगस्ट रोजी होणाऱ्या मेळाव्यासाठी बैठक पद्मालय येथे संपन्न
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
एरंडोल - माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर व महाराष्ट्र राज्य सचिव विनोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनात उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक समाधान पाटील व जळगाव जिल्हा अध्यक्ष बाबाजी पाटील व जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष भगवानदास मोहोरे यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र पद्मालय येथे विश्रामगृहात दि.२८ रविवार रोजी बैठक खेळी मेळीच्या वातावरणात . श्री क्षेत्र पद्मालय येथे माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती व पोलीस मित्र फाउंडेशन तर्फे मीटिंग आयोजित करण्यात आली. मीटिंगमध्ये ११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मेळाव्यासाठी संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच त्याबद्दल समाधान पाटील यांची उत्तर महाराष्ट्र संघटक पदी निवड झाल्याबद्दल त्यांना भगवानदास मोहोरे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष यांच्यातर्फे एक पेन भेट देऊन सत्कार करण्यात आले.तसेच पुढील सामाजिक कार्यासंदर्भात कोणकोणते उपक्रम राबवा याचे या बद्दल नियोजन करण्यात आले
जसे वृक्षा रोपण, शाळा व शाळा परिसर स्वच्छता, गुणवंतांचा सत्कार इत्यादी.या प्रसंगी बैठकीत समितीचे उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक , समाधान पाटील पाटील ,जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष भगवानदास मोहोरे, जळगाव जिल्हा अध्यक्ष ध्यक्ष बाबाजी पाटील, जळगाव तालुका अध्यक्ष शरद मोरे, ज्ञानेश्वर पाटील जळगाव तालुका उपाध्यक, तुषार पाटील जळगाव सहसचिव , दिपक चांभार जळगाव तालुका कार्याध्यक्ष ,हरिष गायकवाड जळगाव तालुका संघटक , नितीन पाटील जळगाव तालुका सहसघटक , संदीप चौधरी जळगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख ,स्वप्निल बोरसे एरंडोल तालुका उपाध्यक्ष,पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते
No comments