adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव ला कामानिमित्त आलेल्या त्या माणसाला धानोरा येथील एका पिंजारी समाजातील तरुणाने वाचवीले प्राण

जळगाव ला पारोळा तालुक्यातील मोंढाळे येथुन कामानिमित्त आलेल्या त्या माणसाचे धानोरा येथील एका पिंजारी समाजातील तरुणाने वाचवीले प्राण  पारोळा त...

जळगाव ला पारोळा तालुक्यातील मोंढाळे येथुन कामानिमित्त आलेल्या त्या माणसाचे धानोरा येथील एका पिंजारी समाजातील तरुणाने वाचवीले प्राण 


पारोळा तालुक्यातील मोंढाळे या गावचा एक अपंग माणूस विजय किसन वानखेडे ,जळगाव ला काही कामानिमित्त आला होता.तो नवी पेठ मधील दुकान कडे चालत आला.तर गटारी वरून पाणी वाहात होते.गटार दिसत नव्हती .आणि या गटारीत पडला.त्याचे छत्री वगैरे सामान्य तर वाहून गेले पण धानोरा या गावातील पिंजारी समाजातील तरुणाने धरून बाहेर काढला.म्हणून वाचला.हा तरूण तेथे नसता तर म्हणे हा वानखेडे वाहून गेला असता.

            तो मेला असता तर आपले आमदार आणि पालकमंत्रीने त्याच्या विधवा बायकोला मदतीचा चेक दिला असता.आणि फोटो काढून पेपरला दिला असता.चमचे म्हणाले असते, आमच्या मामाने आणि भाऊने विधवा महिलेला आर्थिक मदत केली.किती चांगला आहे आमचा मामा आणि भाऊ ?

    तो वानखेडे हरिभक्त परायण आहे.आणि अरसद पिंजारी बिचारा दुकानातील कामगार आहे.कोणी कुणाचा धर्म विचारला नाही.कोणी कोणाची जात विचारली नाही.येथे मानवी मन हळहळते मानसाला वाचवण्यासाठी.अरसद पिंजारीच्या हृदयात  मानवतेचा कळस मजबूत होता.

आणि हे राजकीय पक्षनेते जाती वरून, धर्मावरून भेद फैलावत असतात.फक्त निवडून येऊन मलिदा चाटण्यासाठीच!... 

शिवराम पाटील  मो . ९२७०९६३१२२

महाराष्ट्र जागृत जनमंच



जळगाव

No comments