महात्मा गांधी पॉलीटेकनिक कॉलेज चोपडा येथे वनमहोत्सव "एक पेड माँ के नाम" आणि "अमृतवृक्ष आपल्या दारी या योजने अंतर्गत वृक...
महात्मा गांधी पॉलीटेकनिक कॉलेज चोपडा येथे वनमहोत्सव
"एक पेड माँ के नाम" आणि "अमृतवृक्ष आपल्या दारी या योजने अंतर्गत वृक्षारोपण
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
महात्मा गांधी पॉलीटेकनिक कॉलेज चोपडा येथे आज दि. २० जुलै २०२४ रोजी वनमहोत्सव अंतर्गत "एक पेड माँ के नाम" आणि "अमृतवृक्ष आपल्या दारी या योजने अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असता, कार्यक्रमास वनक्षेत्रपाल श्री. योगेश सातपुते, वनपाल श्री. भामरे,पॉलिटेकनिक कॉलेजचे प्रिन्सिपॉल श्री. व्ही एन बोरसेसर, चेअरमन सौ. पाटील मॅडम, कॉलेजचे HOD शिक्षक, श्री. मधुकर बारी, अंकुश धुपे, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी वृक्षारोपण व पर्यावरण प्रतिज्ञा वाचन करण्यात आले.








No comments