चहार्डी शिवारात २०० ब्रास अवैध वाळू साठा जप्त चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.. काल्पनिक चित्र नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा...
चहार्डी शिवारात २०० ब्रास अवैध वाळू साठा जप्त चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

काल्पनिक चित्र
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड )
चोपडा तालुक्यातील चहार्डी शिवारातील गट क्र ९०३ शेत मालक गणेश रमेश पाटील यांचा शेतात विना परवाना साठा केलेली ९ लाख ४० हजार रुपये (अंदाजित किंमत) असलेली २०० ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. दि. ०९/०७/२०२४ रोजीचे दुपारी १ :३० वाजेच्या पूर्वी तारीख व वेळ नक्की माहीती नाही चहार्डी शिवारातील शेत गट नंबर ९०३ शेत मालक गणेश रमेश पाटील व त्यांच्या सोबत ट्रैक्टर किंवा डंपर चालक व मालक रा. चहार्डी ता चोपडा यांनी कुठलीही शासनाची शासकीय परवानगी अथवा अवैध्यरित्या वाळु वाहतुक परवाना नसतांना अवैध्यरित्या गौण खनिज वाहतुक व साठा करुन तिची नदी पात्रातुन शासनाची परवानगी न घेता लबाडीच्या इराद्याने फिर्यादीच्या व शासनाच्या संमती वाचुन चोरून नेली आहे चोरुन घेवून जाऊन तिचा साठा करुन ठेवलेला आहे म्हणुन शेत मालक गणेश रमेश पाटील व ईतर त्यांच्या सोबत त्यांनी वाळू साठा करण्यासाठी लावलेली ट्रैक्टर किवा डंपर मालक व चालक नाव गाव माहीत नाही यांच्या विरुध्द फिर्यादी तलाठी मुकेश सुरेश देसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम.३०३(३), ३(५), सह विकास व विनिमय सह खनिजे १९५७ चे कलम २२, व महाराष्ट्र जमीन महसुन अधिनीयम १९६६ चे कलम, ४८(७), (८), आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम, ३ व ११५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचा मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरीक्षक अनिल भुसारे करीत आहे
No comments