ईकेवायसीसाठी कालमर्यादा नाही ,केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री :- हरदीपसिंग पुरी एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा दिला नेशन महाराष...
ईकेवायसीसाठी कालमर्यादा नाही,केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री :- हरदीपसिंग पुरी
एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा दिला
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- वृत्तसंस्था नवी दिल्ली
संपादक :-हेमकांत गायकवाड
नवी दिल्ली : बऱ्याच घरांमध्ये गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. आता ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी कस्टमर्ससाठी ईकेवाईसी लागू केले आहे. ईकेवाईसी अनिवार्य केल्यावर गॅस एजन्सीमध्ये ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. ग्राहकांना येणाऱ्या समस्यांबाबत केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी एक पत्र लिहिलं आहे. त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांना हे पत्र लिहून ग्राहकांना त्रास होत असल्याने ही गैरसोय दूर करण्याची विनंती केली होती. आता केंद्रीय मंत्र्यांनी सतीशन यांच्या पत्राला उत्तर दिलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर उत्तर देऊन ईकेवायसी संदर्भातील सर्व गैरसमज दूर केले आहेत. तुम्हीही गॅसच्या ईकेवायसीमुळे गोंधळले असाल तर ही माहिती नक्की वाचा.CNG-PNG Gas Price Hike : बजेटआधी CNG -PNG च्या दरात वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार मोठी कात्री ईकेवायसीसाठी कालमर्यादा नाही हरदीपसिंग पुरी यांनी एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. फेक अकाउंट बंद करण्यासाठी आणि कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या बनावट बुकिंगवर आळा घालण्यासाठी ऑईल मार्केटिंग कपन्यांनी ईकेवायसी लागू केले आहे, असं पुरी यांनी उत्तरात म्हटलं आहे. ईकेवायसीची प्रक्रिया मागच्या आठ महिन्यांहून जास्त काळापासून सुरू आहे. पुरी यांनी स्पष्ट सांगितलं की ईकेवायसी पूर्ण करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. म्हणजेच ग्राहकांना ईकेवायसीबद्दल काळजी करण्याची गरज नाही. ईकेवायसी अभियानाचा उद्देश फक्त ओरिजनल ग्राहकांनाच एलपीजी सर्व्हिस मिळावी हा आहे, असं ते म्हणाले.
घरी बसून करता येते ईकेवाईसी
ग्राहकांना ईकेवायसी करण्यासाठी गॅस एजन्सीमध्ये जाण्याची गरज नाही. ते घरबसल्या सहज ईकेवायसी करून घेऊ शकतात. ग्राहक गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांद्वारे ईकेवायसी करू शकतात, अशी माहिती पुरी यांनी दिली. एलपीजी सिलिंडरची डिलीव्हरी करणारे गॅस एजन्सी कर्मचारी मोबाइल ॲपद्वारे आधार क्रेडेंशियल्स कॅप्चर करतील.- आधार क्रेडेंशियल कॅप्चर केल्यावर ग्राहकाच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.- ओटीपी टाकल्यानंतर ईकेवायसी होईल.- याशिवाय ग्राहक ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या ॲप्सद्वारे स्वतःही ईकेवायसी पूर्ण करू शकतात.

No comments