adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुख्यमंत्री साहेब, लग्नासाठी कुणी मुलगी देईना!

  मुख्यमंत्री साहेब, लग्नासाठी कुणी मुलगी देईना!  जमलं तर एखादी लाडका भाऊ योजना आणा; शेतकरी पुत्रानं वेधलं सर्वांचं लक्ष नेशन महाराष्ट्र न्...

 मुख्यमंत्री साहेब, लग्नासाठी कुणी मुलगी देईना! 

जमलं तर एखादी लाडका भाऊ योजना आणा; शेतकरी पुत्रानं वेधलं सर्वांचं लक्ष


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- भंडारा

(संपादक:- हेमकांत गायकवाड )

भंडारा : शेतकर्‍यांच्या मुलांना कुणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होईना. मुख्यमंत्री साहेब जमलं तर एखादी लाडका भाऊ योजना सुद्धा नक्की आणा. अशी मागणी केली आहे भंडाऱ्याच्या एका शेतकरी पुत्राने. शेतकर्‍यांच्या मुलांचे काही कल्याण होईल, अशी एखादी योजना काढावी आणि तरुणांसह शेतकरी पुत्रांनाही दिलासा द्यावा, यासाठी या युवा शेतकरी पठ्ठ्यानं चक्क हातात फलक घेत गावाच्या चौकात उभा राहून सऱ्यांचे लक्ष वेधले आहे.  हातात फलक घेऊन त्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्याकडे ही मागणी केली आहे.

मुख्यमंत्री साहेब, लग्नासाठी कुणी मुलगी देईना!

राज्य सरकारनं नुकतीच लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यात महिलांना दीड हजार रुपये महिना मानधन देण्यात येणार आहे. याच धर्तीवर शेतकरी पुत्रांसाठी लाडका भाऊ योजना काढावी, अशी या शेतकरी पुत्राची लक्षवेधी मागणी आहे. जयपाल प्रकाश भांडारकर असं पदवीचं शिक्षण घेणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. जयपाल याच्याकडे सहा एकर स्वतःची शेती असून त्यात तो भात पिकासह बागायती शेती करून उत्पन्न घेतो.

मात्र, शेतकरी आणि त्यांच्या पुत्रांची काय दशा आहे. शेतकरी पुत्रांना विवाहासाठी मुलीही मिळत नसल्याची खंत या युवा शेतकऱ्यांनं बोलून दाखविली आहे. या युवा शेतकऱ्यांनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडं केलेल्या अशा प्रकारच्या अभिनव मागणीची आता गावात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र ही भावना गांव खेड्यातील प्रत्येक तरुण शेतकरी तरूणांनाची असल्याची भावना समाजातून व्यक्त केली जात आहे. 

No comments