दि.१७ ते १९ ऑगस्ट दरम्यान विटनेर येथे सद्गुरू संत तानाजी महाराज ८६ वा समाधी महोत्सवाचे आयोजन नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा (संपादक....
दि.१७ ते १९ ऑगस्ट दरम्यान विटनेर येथे सद्गुरू संत तानाजी महाराज ८६ वा समाधी महोत्सवाचे आयोजन
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक. :- हेमकांत गायकवाड )
चोपडा तालुक्यातील विटनेर येथे दि.१७ ते १९ ऑगस्ट दरम्यान सद्गुरू संत तानाजी महाराज यांच्या ८६ वा समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने त्रिदिवासीय कीर्तन महोत्सव व संत तानाजी महाराजांचा उत्तर प्रदेश फिरस्ती दौरा होणार आहे,दरम्यान दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळी श्रींच्या पादुकांचे तापीस्नान झाल्यावर शोभायात्रा,सकाळी ९ वाजता महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.ना.अनिल भाईदास पाटील व त्यांच्या धर्मपत्नी मा.जयश्री ताई पाटील यांच्या हातून श्रींच्या पादुकांचा अभिषेक व महापूजा,तसेच प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मा.महादेव खेडकर साहेब यांच्या हस्ते पांडुरंगाचा अभिषेक महापूजा,चोपडा ग्रामीण च्या पोलीस निरीक्षक मा.कावेरी कमलाकर मॅडम यांच्या हातून कुलस्वामीनी चामुंडा मातेची महापूजा होणार असून साय.५ ते ६ हरिपाठ,रात्री ८ वाजता हभप भानुदासजी महाराज चंदिले यांचे ,दि.१८ऑगस्ट रोजी संत माहुजी महाराज परंपरेचे वंशज हभप विठ्ठलजी महाराज,आडगावकर यांचे हरिकीर्तन, दि.१९ ऑगस्ट रोजी मुख्य समाधी सोहळा संपन्न होणार असून बालब्रह्मचारी महंत सतिषदास जी महाराज भोंगे, हभप नवलसिंग राजे, हभप प्रमोदजी महाराज भोंगे,मा. चंद्रशेखर पाटील,मा.छगन गुर्जर, मा.प्रफुल पाटील,मा.विजयसिंह गुर्जर यांच्या हातून पूजा होऊन सकाळी ९ ते ११ आदिशक्ती मुक्ताई संस्थानचे हभप रवींद्रजी महाराज हरणे यांचे काल्याचे किर्तन होऊन,११ वाजता फुलांचे कीर्तन होऊन समाधी सोहळा संपन्न होईल त्यानंतर महाप्रसाद,सायंकाळी ४ वाजता भव्य दिंडी सोहळा,रात्री ९ वाजता भारुडांचा कार्यक्रम होऊन समाधी महोत्सवाची सांगता होईल,दि.२० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता श्रींच्या पादुका उत्तर प्रदेश फिरस्तीसाठी रवाना होतील
तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ अवश्य घ्यावा असे निवेदन सद्गुरू संत तानाजी महाराज परंपरेचे वंशज महंत प्रा हभप सुशीलजी महाराज विटनेरकर व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ विटनेर यांचे वतीने करण्यात आले आहे

No comments