adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडीयम स्कूल तालुक्यात सर्वप्रथम

  स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडीयम स्कूल  तालुक्यात सर्वप्रथम   प्रथम क्रमांकाच्या 3 लाख रुपयांच्या पारितोषिकाने व स्मृतिचिन्हाने मान...

 स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडीयम स्कूल  तालुक्यात सर्वप्रथम 

प्रथम क्रमांकाच्या 3 लाख रुपयांच्या पारितोषिकाने व स्मृतिचिन्हाने मान्यवरांच्या हस्ते  गौरोन्वित करण्यात आले.



नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- मुक्ताईनगर प्रतिनिधी

(संपादक :-  हेमकांत गायकवाड)

स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल,मुक्ताईनगर "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत"

 प्रथम क्रमांकाच्या 3 लाख रुपयांच्या पारितोषिकाने व स्मृतिचिन्हाने मान्यवरांच्या हस्ते गौरोन्वित करण्यात आले.

महाराष्ट्र शासन क्रीडा व शिक्षण विभागांतर्गत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या परिकल्पनेतून राबविण्यात आलेल्या "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत" मुक्ताईनगर तालुक्यातील माध्यमिक विभागातून एन. के. एस.  स्कूल ला  घेण्यात आलेल्या पंचायत समिती शिक्षण विभाग मुक्ताईनगर तर्फे आयोजित डॉ .बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रथम क्रमांकाचे रुपये तीन लाखाचे पारितोषिक तथा स्मृति चिन्ह शाळेचे मुख्याध्यापक व्ही. के. वडस्कर यांनी आपल्या सह शिक्षकांसह  आमदार चंद्रकांत पाटील,

 गटशिक्षणाधिकारी मदन व्ही. मोरे, मुक्ताईनगर ,केंद्रप्रमुख धनलाल वसंत भोई, मुक्ताईनगर, केंद्रप्रमुख उचंदे

  मा. संजय ठोसर,  योगेश भोसले बी आर सी, भूषण चौधरी केंद्रप्रमुख ,विजय चौधरी केंद्रप्रमुख,गणेश कोळी आणि शेख भिकन केंद्रप्रमुख सुनील आर आढागळे ज्येष्ठ शिक्षक आणि तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सर्व शाळांचे सहशिक्षक यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते स्वीकारले पारितोषिक. 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत पुरस्कार स्वीकारल्या बद्दल आणि शाळेला गौरोन्वित

प्राप्त झाल्या बद्दल आपले मनोगत व्यक्त करीत असता मुख्याध्यापक व्ही. के.वडस्कर यांनी म्हटले की हा बहुमान आमच्या करिता फार मोठ्या अभिमानाची व स्वाभिमानाची बाब राहील.

 विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय व ब्रीद राहिलेले आहे ते साकार करण्याकरिता आम्ही सदैव कटिबद्ध आहोत आणि या संदर्भात वेळोवेळी शाळेचे अध्यक्ष तथा सचिव रक्षाताई खडसे क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री भारत सरकार यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभात असते तसेच हा बहुमान कुण्या एकट्याचा नसून संपूर्ण एन. के. एस. परिवाराचा आहे आणि मी मुख्याध्यापक म्हणून माझ्या सर्व सहकारी शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे तथा त्यांच्या पालकांचे या संदर्भात हार्दिक- हार्दिक अभिनंदन करतो आणि पुरस्कार वितरित करून आम्हाला गौरोन्वित केल्याबद्दल आणि  असा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि शिक्षण विभाग पंचायत समिती मुक्ताईनगर तथा उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक पत्रकार बंधू आणि भगिनी यांचे आभार मानतो तथा इतर पारितोषिक प्राप्त शाळांचे कौतुक व हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो.

No comments