मा. खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन. बुधवार दि.७ ऑगस्ट रोजी काटेल धाम येथिल संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.प...
मा. खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.
बुधवार दि.७ ऑगस्ट रोजी काटेल धाम येथिल संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.प्रशांत डिक्कर.
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- अमोल बावस्कार मलकापूर
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
संग्रामपूर :- कष्टकरी मायबाप जनतेच्या न्याय हक्कासाठी चळवळ मध्ये राबणाऱ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष मा. खा.राजू शेट्टी उद्या ७ आगस्ट रोजी संग्रामपूर तालुक्यात येत आहेत. या निमित्ताने श्री संत गुलाबबाबा नगरी काटेल संस्थान येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा. खा. राजू शेट्टी कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या संवाद मेळाव्यासाठी आवश्यक या असे आवाहन स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केले आहे. एक महिन्यापूर्वी बारामती येथे पार पडलेल्या स्वाभिमानीच्या राज्यस्तरीय बैठकीत प्रशांत डिक्कर यांची जळगाव जा. मतदारसंघासाठी घोषणा करण्यात आल्यानंतर या मतदारसंघात स्वाभिमानी तुल्यबळ लढत देणार असल्याचे निश्चित झाली आहे. याच निमित्ताने मा. खा. राजू शेट्टी जिल्ह्यात येत आहेत. सवांद मेळाव्याची जय्यत तयारी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याच सवांद मेळाव्यातून खा. राजू शेट्टी जळगाव जा. विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फूंकणार असल्याने या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments