मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांची केली आरोग्य तपासणी सामाजिक कार्यकर्ते संदीप कोळी यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस निमी...
मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांची केली आरोग्य तपासणी
सामाजिक कार्यकर्ते संदीप कोळी यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस निमीत्त शालेय विद्यार्थ्यांची केली आरोग्य तपासणी
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
चौगाव :- आज रोजी सामाजिक कार्यकर्ते श्री. संदीप कोळी यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस मोठया थाटामाटात साजरा न करता चौगाव जि.प.शाळेत आरोग्य तपासणी कॅम्प ठेऊन अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.
या कॅम्प मध्ये शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून विध्यार्थ्यांना योग्य ती औषधी यावेळी देण्यात आली. तसेच यावेळी डॉ. प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी माहिती देऊन काळजी घेण्याचे आव्हान केले.
या कार्यक्रमात डॉ.प्रशांत पाटील,सामाजिक कार्यकर्ते तथा माजी शालेय शिक्षण समितीचे सदस्य श्री.संदीप कोळी,श्री.एकनाथ कोळी, शाळेतील मुख्याध्यापक श्री. संतोष सोनवणे,शिक्षक श्री. विद्यानंद साठे,शिक्षिका राजश्री बाविस्कर, प्रिती भावसार,प्रितम सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
No comments