अंकलेश्वर -ब-हाणपुर चोपडा यावल रस्त्याची दुरुस्तीसाठीची आमदार लताताई सोनवणे यांच्या मागणीला यश नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा (संप...
अंकलेश्वर -ब-हाणपुर चोपडा यावल रस्त्याची दुरुस्तीसाठीची आमदार लताताई सोनवणे यांच्या मागणीला यश
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड )
अंकलेश्वर - बऱ्हाणपुर चोपडा यावल रस्त्याच्या दुरुस्तीचे काम नुकतेच झाले असून या रस्त्यावरील चोपडा ते गलंगी दरम्यान काही पुलावरील पुष्ठभाग खराब झालेला आहे. तसेच पुर्ण रस्त्याचा पृष्ठभाग हे अत्यंत खराब झालेला असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच या पुर्वी दुरुस्त केलेल्या रस्त्यावरही खड्डे पडलेले असून अडावद गावात रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असुन तरी या बाबीचा विचार करावा व चोपडा ते यावल रस्त्यावरील या पुर्वी दुरुस्त केलेल्या रस्त्याची तसेच अडावद गाव अंतर्गत रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न केल्यास मी १५ ऑगस्ट २०२४ रोजी उपोषणास बसेल. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली होती
रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असल्याबाबतचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय, भारत सरकार) परियोजना कार्यान्वय इकाई, जळगांव यांच्याकडून दखल
चोपडा तालुक्याचे लाडके आमदार लताताई सोनवणे यांच्या पत्रकाची भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय, भारत सरकार) परियोजना कार्यान्वय इकाई, जळगांव यांच्याकडून दखल घेण्यात आली असून दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की तळोदा ते महाराष्ट्र/मध्यप्रदेश हद्दी पर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून साधारणतः ५०% काम पूर्ण झालेले आहे सध्या पावसामुळे डांबरीकरणाचे काम करता येणे शक्य नाही परंतु आपल्याशी झालेल्या चर्चेनुसार चोपडा ते धानोरा येथे दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. (सोबत फोटो जोडत आहोत).
दिनांक १६/०८/२०२४ पासून अडावद येथे दुरुस्ती काम करण्याचे नियोजन आहे. अडावद धानोरा-किनगाव या ठिकाणच्या दुरुस्तीचे काम दिनांक ०५/०९/२०२४ पर्यत पूर्ण करण्यात येईल. वरील बानी विचारात घेता व आपल्या मागण्याबाबत सकारात्मक कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे



No comments