adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विशाल सनेरसर (जि.प. शाळा भवाळे ता.चोपडा प्राथमिक शिक्षक ) यांचे सहाय्यक प्राध्यापक ( सेट )पदासाठीची परीक्षेत यश

विशाल सनेरसर (जि.प. शाळा भवाळे ता.चोपडा प्राथमिक शिक्षक ) यांचे सहाय्यक प्राध्यापक ( सेट )पदासाठीची परीक्षेत यश  नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युर...

विशाल सनेरसर (जि.प. शाळा भवाळे ता.चोपडा प्राथमिक शिक्षक ) यांचे सहाय्यक प्राध्यापक ( सेट )पदासाठीची परीक्षेत यश 



नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- शिरपूर/शामसुंदर सोनवणे हातेड

संपादक  :- हेमकांत गायकवाड 

भाटपुरा ता.शिरपुर येथिल रहिवासी श्रीमती कल्पनाबाई पुंडलिक सनेर (अंगणवाडी सेविका) यांचे चिरंजीव तर आदर्श शिक्षक जितेंद्र सनेर यांचे लहान बंधू व धुळे जिल्हा कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्षा सौ ताईसाहेब सुचेता जितेंद्र सनेर यांचे  दिर श्री विशाल पुंडलिक सनेर (जिल्हा परिषद शाळा भवाळे तालुका चोपडा येथील प्राथमिक शिक्षक ) यांनी नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक ( सेट )पदासाठीची परीक्षा घेण्यात आली असून मराठी या विषयात ते उत्तीर्ण झाले असुन यामुळे नाभिक समाजासाठी खूपच अभिमानास्पद व गौरवाची बाब असुन निश्वितच असे गुणवान शिक्षक समाजाला लाभले तर समाजाचा विकास झाल्या शिवाय राहणार नाही यात खरे मोलाचे मार्गदर्शन त्यांचे मोठे बंधू जितेंद्र सनेर सर यांचे लाभले तर परिसरातून सुद्धा त्यांना या मिळालेल्या यशाबद्दल गौरविण्यात येत आहे 


शिरपूर शहरात लवकरच नाभिक समाज बांधवांच्या उपस्थिती मध्ये विशाल सनेर सरांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास सेन उपाध्यक्ष रामचंद्र येशी सचिव सौ हेमलता रामचंद्र येशी कळविले असुन विशाल सनेर सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 

1 comment

  1. आपण आमच्या यशाची बातमी प्रसिद्ध केली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार

    ReplyDelete