आव्हाणे येथील " वंदे मातरम बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्थेमार्फत विद्यालयातील १० वी विशेष प्रविण्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव ...
आव्हाणे येथील " वंदे मातरम बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्थेमार्फत विद्यालयातील १० वी विशेष प्रविण्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- आव्हाणे
संपादक :- हेमकांत गायकवाड
श्रीमती.शा. पु. चौधरी माध्य. विद्यालय आव्हाणे. येथेआज दि ०७ /०८ /२०२४ रोजी आव्हाणे येथील " वंदे मातरम बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्थेमार्फत विद्यालयातील १० वी विशेष प्रविण्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.याप्रसंगी समारंभाचे अध्यक्ष म्हणुन आव्हाणे येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. धनलाल सेठ शिरसाठ व्यासपीठावर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन मा. पंचायत समिती सदस्य ऍड. हर्षल चौधरी,माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री भगवान चौधरी, श्री.समाधान पाटील, डॉ. एकनाथ पाटील इ.मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या प्रसंगी सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक श्री.व्ही.डी. चौधरी सर यांनी विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
तदनंतर मान्यवरांच्या हस्ते उत्तीर्ण विध्यार्थ्यांना वंदे मातरम् बहुउद्देशीय स्वयंसेवी यांचे वतीने प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.मान्यवरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना केवळ नोकरी साठी प्रयत्न न करता उद्योजक होणेसाठी तयार राहावे याबाबत अनमोल मार्गदर्शन केले.गुणगौरव समारंभाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे कला शिक्षक श्री. पी.जी.पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित होणेसाठी अवलंब करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी वंदे मातरम बहुउद्देशीय संस्था आव्हाणे यांचे विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक सस्नेह आभार💐💐💐☘️☘️💐💐
No comments