चौगाव येथील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू चौगाव गावालगत वन विभागातील कक्ष क्र.२६० मधिल पाझर तलावात बुडून मृत्यू विश्राम तेले :- चौगाव दि...
चौगाव येथील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू
चौगाव गावालगत वन विभागातील कक्ष क्र.२६० मधिल पाझर तलावात बुडून मृत्यू
विश्राम तेले :- चौगाव दि.२३
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
चौगाव येथील विजय बळीराम कोळी हा शेतावरूण येऊन आपल्या तीन मित्रांसोबत चौगाव गावालगत वन विभागातील कक्ष क्र.२६० मधिल पाझर तलावात दुपारी १२:३० ला पोहायला गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने १२:४० वाजता पाण्यात बुडाला. त्याला शोधण्याचे खुप प्रयत्न केले गेले पण तलावात जास्त पाणी असल्याने शक्य होत नव्हते.अखेर संध्याकाळी ०६:३० वाजता त्याला पाण्या बाहेर काढण्यात यश आले.विजयचे वडील मुळ बिडगाव ता चोपड्याचे रहीवाशी असून घरची परीस्थीती गरीबीची असल्यामुळे गेले सात आठ वर्षापासून चौगावला त्यांच्या साडूकडे येऊन विभक्त राहात होते. अठरा वर्षीय विजय हा एकूलता एक मुलगा होता.घटनास्थळी विजयचे पार्थीव बाहेर काढे पर्यंत चोपडा ग्रामिण पोलिसस्टेशनच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर,नायब तहसिलदार,तलाठी भुषण पाटील,चौगावचे पोलिस पाटिल गोरख राजपूत,वन विभागाचे कर्मचारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

No comments