Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल तालुक्यात विवाहितेवर अत्याचार करून विवस्त्र फोटो केले व्हायरल आरोपीवर गुन्हा दाखल

  यावल तालुक्यात विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून विवस्त्र फोटो केले व्हायरल आरोपीवर गुन्हा दाखल इदू पिंजारी,फैजपूर (संपादक :- हेमकांत गायकव...

 यावल तालुक्यात विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून विवस्त्र फोटो केले व्हायरल आरोपीवर गुन्हा दाखल


इदू पिंजारी,फैजपूर

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

फैजपुर :- यावल तालुक्यात  एक ३६ वर्षीय विवाहिता शेत शिवारामध्ये शौचालयास गेली असताना एका संशयित आरोपीने तिचा विनयभंग करून केळीच्या शेतात ओढत नेऊन विवस्त्र करण्यात आले व त्या अवस्थेत फोटो काढून अत्याचार करण्यात आला. व ते विवस्त्र फोटो पीडित महिलेच्या नणंदेच्या मदतीने व्हायरल केले.सदरील ही घटना २३ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला या प्रकरणी संशयित आरोपी विनोद मेढे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की यावल तालुक्यातिल एका गावामध्ये ३६ वर्षीय पिडित विवाहिता परिवारासह राहत असून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असून ही महिला शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता एका शेत शिवारामध्ये शौचालयासाठी गेली होती त्यावेळेला तिथे संशयित आरोपी विनोद मेढे हा आला त्याने महिलेचा शेतात फरफटत  नेले व त्या ठिकाणी तिला पूर्ण विवस्त्र करून तिचे फोटो काढून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली तिने त्याला नकार देताच त्याने तिच्यावर  लैंगिक अत्याचार करून तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली तितकेच नव्हे तर संशयित आरोपी विनोद मेढे याने महिलेचे विवस्त्र  फोटो काढून पीडित महिलेची ननंद हिच्याकडे पाठवले तिने ते फोटो नातेवाईकांमध्ये व्हायरल केले या संदर्भात पीडित महिलेने फैजपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून दोघांविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहे.


  

No comments