Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तहसील कार्यालयामार्फत महसूल दिन १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट महसूल पंधरवाडा- २०२४ आयोजित

चोपडा तहसील कार्यालयामार्फत महसूल दिन १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट महसूल पंधरवाडा - २०२४ आयोजित नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- चोपडा (संपादक  :- ...

चोपडा तहसील कार्यालयामार्फत महसूल दिन १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट महसूल पंधरवाडा- २०२४ आयोजित



नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- चोपडा

(संपादक  :- हेमकांत गायकवाड)

महसूल विभामार्फत राज्यात महसूल दिन दि.१ ऑगस्ट पासून महसूल पंधरवडा २०२४ साजरा करणेबाबत शासनाने ३० जुलै २०१४ रोजी आदेश दिला आहे. महसूल विभागाकडून पुरविण्यात येणा-या सेवा सुविधा आणि विभागाव्दारे राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत जनतेला / नागरीकांना अधिकाअधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच नागरिकांमध्ये जागरुकता वाढून शासनावर  विश्वास व्दिगुणित व्हावा यासाठी विशेष मोहीम लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने  ऑगस्ट महिन्यात महसूल दिन राबविण्यात येत असतो या वर्षापासून महसूल दिन १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट महसूल पंधरवाडा- २०२४ आयोजित करण्यात आला आहे.


आज १ ऑगस्ट रोजी महसूल पंधरवाडाचा शुभारंभ तहसिल कार्यालय चोपडा येथे सकाळी १२.०० वाजता तालूक्याचे आमदार मा. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे हस्ते करण्यात आले. सदर कार्याक्रमास मा मंगलाताई कैलास पाटील तालूका अध्यक्ष महिला आघाडी, नरेद्र वसंत पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा, एम. व्ही. पाटील माजी उपसभापती पंचायत समिती चोपडा, विकास पाटील माजी उपनगराध्यक्ष चोपडा, नामदेव पाटील समन्वय समिती सदस्य, गणेश पाटील सरपंच मालखेडा व मंगलभाऊ इंगळे सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.



शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ तहसिल कार्यालय स्तरावून देण्यात आलेले लाभार्थी यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभ देण्यात आलेला आहे.

१). संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार योजनेचे एकूण ५५२ प्रकरणे मंजूर करुन १). सोनल विनांद अलकारी अंबाडे २) विमलबाई भगवान भिल अकुलखेडा ३) वैजयंताबाई जगन नाईक- अकुलखेडा ४). आशाबाई उदयसिंग अलकारी अंबाडे

२). मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण       १). सुलोचना सचिन शिरसाठ अनवर्दे खू. २). साधना ईश्वर शिरसाठ अनवर्दे खुर्द ३). ज्योती शरद पाटील अडावद ४). कल्पना संतोष धनगर मंगरुळ ५). हेमूबाई राजेंद्र पाटील- चहार्डी ६). शारदा संतोष पाटील माचला ७). प्रमिला भिकन सोनवणे- वेळोदे

३). ७/१२ उतारे व फेरफार संगणकीकृत वितरण करण्यात आले. १). पंडीत रतन चौधरी २). हनुमंत कृष्णराव माळी ३). छगन बाबूराव माळी ४). संजय सखाराम सोनवणे ५). सुनिल वंजी पालीवाल



४). निवडणूक ओळखपत्र वितरीत १). कुमारी साक्षी कुंदन कुमावत चोपडा २). कुमारी रोशनी अक्षय कुमावत- चोपडा ३). कुमारी गायत्री शरद पाटील चोपडा ४). चि. अभिषेक एकनाथ कोळी चुंचाळे ५). सौ. मनिषा चेतन चौधरी चोपडा

५). महसुल कलम ४३ कमी केले वर्ग २ ची जमीन वर्ग-१ करुन ७/१२ वितरीत केला १).  विनोद विश्वनाथ पाटील- गरताड                                      ६). E. शिधापत्रिका वाटप १). पांचाळ मंगलाबाई चोपडा २). अंकुश गुलाब भिल. नारोद ३). मंगलाबाई गुलाबराव पाटील- अकुलखेडा ४). शारदा दिलीप अडावदकर अडावद ५). छगन रामसिंग बारेला. ६). प्रविण रतिलाल माळी लासूर

७). जातीचे दाखल १) ज्ञानराज हुकूमचंद बाविस्कर तावसे २). हुकूमचंद धनसिंग कोळी- तावसे

८). PM किसान योजना १). छगन बाबुराव माळी २). संजय सखाराम सोनवणे ३). हनुमंत कृष्णराव शिंदे ४). संतोष जगन्नाथ चौधरी ५). बाबुलाल जगन्नाथ चौधरी 

सदर कार्याक्रमास चोपड्याचे तहसिलदार  भाऊसाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले, आर ओ, वाघ गटविकास अधिकारी व नगर पालिका मुख्याधिकारी राहूल पाटील उपस्थित होते तसेच निवडणूक नायब तहसिलदार सचिन बांबळे, योगेश पाटील निवासी नायब तहसिलदार, आर आर महाजन महसूल नावब तहसिलदार व सर्व कार्यालयीन कर्मचारी सर्व तलाठी कर्मचारी प्रामसेवक उपस्थित होते.

अशी असेल पंधरवडा कार्यक्रमाची रूपरेषा !!

महसुल पंधरवाडा १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट वरील प्रमाणे पंधरवाडा राबविण्यात येणार आहे.कार्यक्रम की रूपरेषा

दिनांक १ )ऑगस्ट - महसूल दिन साजरा करणे व महसूल पंधरवडा शुभारंभ मुख्यमंत्री-माझी लड़की बहन योजना.

२) ऑगस्ट मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

) ऑगस्ट मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

). स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय 

) ऑगस्ट कृषि मार्गदर्शन कार्यक्रम

). शेती पाऊस आणि दाखले 

). युवा संवाद

८). महसूल जन संवाद

९). महसूल इ प्रणाली 

१०). सैनिक हो तुमच्यासाठी 

११). आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन

१२). एक हात मदतीचा - दिव्यांच्या कल्याणाचा 

१३). महसूल अधिकारी/ कर्मचारी यांचे प्रशिक्षण 

१४). महसूल पंधरवडा वार्तालाप 

१५). महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवडा सांगता समारंभ

No comments