केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचा रग्णाला मदतीचा हात दीर्घ आजाराच्या उपचारासाठी मिळवून दिली अडीच लाखांची मदत. रावेर प्रतिनिधी :-मोह...
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचा रग्णाला मदतीचा हात दीर्घ आजाराच्या उपचारासाठी मिळवून दिली अडीच लाखांची मदत.
रावेर प्रतिनिधी :-मोहसीन मुबारक तडवी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मुक्ताईनगर विधानसभा तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातील मोठा वाघोदा येथील रहिवासी मो. आसिफ मो. ताहीर गांना केंद्रीय राज्यमंत्री खासदार रक्षा खडसे यांनी २ लाख ५ हजार रुपये पीएम रोलिफ फंडातून त्वरित मंजूर करून दिले आहेत. आर्थिक स्थिती हालाखीच्या असलेल्या मो. आसिफ यांना कर्करोगाने ग्रस्त आहेत. त्यांना कुठून ही मदत मिळाली नाही. त्यांनी बेटी बचाओ बेटी पढ़ाओच्या जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण यांच्याकडे संपर्क साधला. हा सर्व विषय केंद्रीय राज्यमंत्री खासदार रक्षा खडसे यांना त्यांनी सागितला त्यांनी तत्काळ पीएमओ कार्यालयाशीसंपर्क साधून पीएम रोलिफ फंडातून त्वरित २ लाख ५ हजार रुपये त्यांना मिळवून दिले. मंत्री खडसे यांचे स्वीय सहायक तुषार राणे, कार्यालयीन व्यवस्थापक गणेश कोळी यांनी लगेच कागदपत्रांची पूर्तता केले.बद्दल मो. आसिफ मो. ताहेर यांच्या परिवाराने मंत्री रक्षा खड़से, तूपार राणे, गणेश कोळी व सारिका चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
No comments