Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाचन संस्कार वाढविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार कौतुकास्पद - शास्त्री भक्तीस्वरूपदासजी

  वाचन संस्कार वाढविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार कौतुकास्पद  - शास्त्री भक्तीस्वरूपदासजी शरद महाजन यांच्याकडे कपाटाची चावी देताना ...

 वाचन संस्कार वाढविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार कौतुकास्पद  - शास्त्री भक्तीस्वरूपदासजी

शरद महाजन यांच्याकडे कपाटाची चावी देताना शास्त्री श्री भक्ती स्वरूप दास जी सोबत शास्त्री धर्मनंदनदासजी, शास्त्री स्वयंप्रकाशदासज, ललित कुमार फिरके व पदाधिकारी

इदू पिंजारी, फैजपूर

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

भारत विद्यालयाच्या ग्रंथालयाला ललित फिरके यांचे कडून कपाट भेट

फैजपूर - न्हावी येथील डिजिटलच्या आधुनिक युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. ग्रंथ व पुस्तके यांच्याकडे मोठी माणसेच नाही तर विद्यार्थीसुद्धा दुर्लक्ष करीत आहेत. परंतु ज्ञानाचे सर्व मूळ हे ग्रंथ व पुस्तकात असल्याने त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात ओढ निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमधील ग्रंथालये विकसित झाली पाहिजे  याच पद्धतीचा पुढाकार भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले  मुख्याध्यापक ललितकुमार फिरके यांनी घेतला आहे. त्यांनी वाचन संस्कार वाढवण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सावदा येथील श्रीस्वामीनारायण गुरूकुलचे खजिनदार तथा गुजरात येथील कोशिंद्रा गुरूकुलचे उपाध्यक्ष शास्त्री श्रीभक्तीस्वरूपदासजी यांनी येथे केले. 

 येथील भारत विद्यालय व  कनिष्ठ महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला ललितकुमार फिरके यांच्यातर्फे डबल डोअर कपाट भेट देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी सावदा स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री स्वयंप्रकाशदासजी तसेच गुजरात मधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी गुरूकुलचे अध्यक्ष शास्त्री धर्मनंदनदासजी, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष अनिल लढे, चेअरमन प्रा.डॉ. के.जी. पाटील, सेक्रेटरी जयंत बेंडाळे, संचालक हर्षद महाजन, संदेश महाजन, डॉ. विजय झोपे, पी एच महाजन, सागर चौधरी, नारायण कोलते ,भानुदास चोपडे, मुख्याध्यापक व्ही.बी. वारके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ललितकुमार फिरके उपस्थित होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन म्हणाले की, ग्रामीण भागातील शाळा असली जरी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सगळ्या सोयीसुविधा शाळेने उपलब्ध करून दिल्या आहेत. याच शाळेने हजारो विद्यार्थ्यांना घडविले आहे. ललितकुमार फिरके सर यांनी शाळेला दिलेली ही भेट विद्यार्थ्यांसाठी नक्कीच लाभदायी ठरणार असल्याचेही ते म्हणाले. यानंतर ललितकुमार फिरके म्हणाले की, भारत विद्यालयाचा मी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. विद्यालयाने मला ज्ञानासोबतच संस्कार, शिक्षण आणि जीवनाचे धडेही दिले. ज्या शाळेत मी शिक्षण घेतले, त्याच शाळेतील विद्यार्थ्यांचेही वाचन संस्कार विकसित व्हावे, यासाठी मी आपल्या शाळेतील ग्रंथालयाला एक डबल डोअर कपाट भेट देत आहे. या माध्यमातून ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांना ठेवण्यासाठी एक चांगली जागा उपलब्ध होईल आणि ही पुस्तके पुढील काही वर्षे विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चेअरमन प्रा.डॉ. के.जी. पाटील यांनी केले.



No comments