adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा शहरातील विविध समस्या सोडविण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

  चोपडा शहरातील विविध समस्या सोडविण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर साने गुरुजी नगर परिसरातील अति...

 चोपडा शहरातील विविध समस्या सोडविण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

साने गुरुजी नगर परिसरातील अतिक्रमणाच्या कार्यवाहीला वेग द्या - रहिवास्यांची मागणी


चोपडा प्रतिनिधी :- दि. २२ ऑगस्ट २०२४

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

चोपडा शहरातील साने गुरुजी नगर परिसरातील ओपन स्पेस मध्ये झालेल्या अतिक्रमणावर कारवाई होणे संदर्भात स्थानिक रहिवास्यांनी १९ जानेवारी २०२४ रोजी नगरपालिकेकडे तक्रार अर्ज दाखल केलेला होता तरी सदर अर्ज करून सात महिने उलटून व वारंवार पाठपुरावा करून सुद्धा सदर समस्येबाबत नगरपालिकेकडून हळुवार कार्यवाही होत असल्यामुळे नागरिकांनी त्रस्त होऊन नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना गाठले. पण मुख्याधिकारी प्रशिक्षणाकरिता चाळीसगाव येथे गेले असल्यामुळे नगररचना अधिकारी श्री चेतन अहिरराव यांची भेट घेण्यात आली. त्यांच्याशी चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे चोपडा शहरातील रस्त्यांची दुरावस्था,सर्व ओपन स्पेस मध्ये वृक्ष लागवड,गटारींची नियमित स्वच्छता,घाणीचे साम्राज्य असलेल्या ठिकाणी स्वच्छता,सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी समस्या मार्गी लावण्या संदर्भात युवक शहराध्यक्ष शुभम सोनवणे यांच्या लेटरहेड वर निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील शहराध्यक्ष श्री गिरीश देशमुख,जिल्हा संघटक व सचिव श्री. परेश देशमुख ,महिला शहराध्यक्ष सौ. स्वातीताई बडगुजर ,युवक शहराध्यक्ष कुमार शुभम सोनवणे, मिलिंद बडगुजर यांच्या समवेत साने गुरुजी नगर मधून रहिवासी श्री.अजित बाविस्कर,श्री. मंगेश पाटील, श्री.अंकित सोनवणे,श्री. दिलीप बाविस्कर,श्री. मधुकर पाटील, श्री.विनोद सोनवणे,श्री. गोपाल बाविस्कर उपस्थित होते. साहेबांनी सदर समस्येला तात्काळ कार्यवाही करून न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सदर कार्यवाहीला वेग देण्यात यावा व पंधरा दिवसाच्या आत सदर समस्या मार्गी काढावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.

No comments