मारूळ येथे नुकसानग्रस्त घराची युवानेते धनंजय चौधरी यांनी केली पाहणी . यावल (प्रतिनीधी ) (संपादक :- हेमकांत गायकवाड) यावल तालुक्यातिल म...
मारूळ येथे नुकसानग्रस्त घराची युवानेते धनंजय चौधरी यांनी केली पाहणी .
यावल (प्रतिनीधी )
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यातिल मारूळ येथे सततच्या मुसळधार पावसामुळे घर कोसळल्याने सुदैवाने जिवत हानी टळली पण आर्थीक नुकसान झाले असून याबाबतीतील माहीती मिळताच आमदार पुत्र धनंजय चौधरी यांनी ताबडतोब मारूळ येथे जाऊन नुकसानग्रस्त जागेची पाहणी केली व
गावातील तलाठी यांना जागेचा आढावा घेण्यासाठी पाठवले व नंतर स्वतः येऊन जागेची पाहणी केली. ८ दिवसात अधिकृत मदत देण्याचे आश्वासन ही दिले आणि ८ दिवसात त्वरित मदत न मिळाल्यास आपल्या परीने मदत करू असे आश्वासन दिले .तर यावेळी मारूळ येथिल सरपंच असद अहमद जावेद जनाब सैय्यद मसरूल अली आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
No comments