adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दिनांक 22 / 09 / 2024 रविवारी बहुजन भारत पार्टीच्या वतीने बहुजन एल्गार मेळाव्याचे आयोजन.

  दिनांक 22 / 09 / 2024 रविवारी  बहुजन भारत पार्टीच्या वतीने बहुजन एल्गार मेळाव्याचे आयोजन.                                   वाशीम प्रतिन...

 दिनांक 22 / 09 / 2024 रविवारी  बहुजन भारत पार्टीच्या वतीने बहुजन एल्गार मेळाव्याचे आयोजन.       


                          

वाशीम प्रतिनिधी

(संपादक हेमकांत गायकवाड)

 बहुजन भारत पार्टीचे वतीने दिनांक 22/9/ 2024 रोजी बहुजन भारत पार्टीच्या वतीने बहुजन एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकटेश कसबे साहेब हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष हे आगामी काळात बहुजन  भारत पार्टीचे विधानसभा ,नगरपरिषद ,जिल्हा परिषद,ग्रामपंचायत यासह सर्वच निवडणुका विषयी प्रा.व्यंकटेश कसबे साहेब हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.त्याचबरोबर महाराष्ट्रात शिंदे -  फडणवीस सरकारकडून शेतकरी ,कष्टकरी ,मजूर यांच्या विषयी असणारे चुकीचे धोरण ,महिला आणि लहान मुलींवर वाढत जाणारे अन्याय आणि अत्याचार, संविधानावर केंद्रशासनामार्फत होत असलेला आघात , भारतात दलित आणि  मुस्लिम यांच्या विषयी होत असलेलं भयावह वातावरण , बीजेपीच्या आमदार आणि खासदारांकडून मुस्लिमांविरोधी असलेले चुकीचे धोरण , अतिक्रमण,  घरकुल , समाज मंदिर हे नियमानुकूल करण्यात यावे , भारतात बंद पडत असलेले मराठी जिल्हा परिषद शाळा,   वाढत जाणारे खाजगीकरण , दलितांवर मुस्लिमांवर , वाढत जाणारा अन्याय आणि अत्याचार  , यासह बऱ्याच विषयावर प्राध्यापक व्यंकटेश कसबे साहेब हे उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे वाशिम मधील सर्व जातीतील आणि धर्मातील बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बहुजन भारत पार्टीचे राज्य सचिव तथा विदर्भ प्रभारी विधानसभा जगदीश मानवतकर सर यांनी केले आहे. 


या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष बालाजी गजले साहेब,  माजी न्यायाधीश तथा बहुजन भारत पार्टीचे प्रदेश सचिव माननीय पांडुरंग खिल्लारे साहेब , अखिल भारतीय मातंग महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागडे साहेब हे उपस्थित राहणार आहेत.तर विशेष अतिथी म्हणून आत्माराम सुतार राजकुमार पडघान , माधव डोंगरदिवे सर , प्रभु. कांबळे ,दिलीप भाऊ गायकवाड संविधान ढोले यांची उपस्थिती राहणार आहे .तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि स्वागताध्यक्ष जगदिश मानवतकर,वाशीम जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ शेळके,जिल्हा उपाध्यक्ष संजय पूंडसे , वाशिम जिल्हा महासचिव विशाल मुंडे , वाशिम जिल्हा शहराध्यक्ष रवी भाऊ ठोके , शहर उपाध्यक्ष गौतम कंकाळ , वाशिम जिल्हा सचिव अक्षय भाऊ इंगोले, आशिष कोकरे, सचिन राऊत, बबनराव वाळके , गजेंद्र राऊत हे हा कार्यक्रमसाठी  मेहनत घेत आहेत.

No comments