Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एकाग्रता व तर्कशुद्ध विचार विकसित करण्यासाठी बुद्धिबळ सातत्या खेळा.... डॉ. सी. एस. चौधरी.

  एकाग्रता व तर्कशुद्ध विचार विकसित करण्यासाठी बुद्धिबळ सातत्या खेळा.... डॉ. सी. एस. चौधरी. मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक  :-हे...

 एकाग्रता व तर्कशुद्ध विचार विकसित करण्यासाठी बुद्धिबळ सातत्या खेळा.... डॉ. सी. एस. चौधरी.


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक  :-हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर:- मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित, श्रीमती जी .जी. खडसे महाविद्यालय ,मुक्ताईनगर  येथे क .ब. चौ.उ.म. विद्यापीठ जळगाव अंतर्गत जळगाव क्रीडा विभागाच्या आंतर महाविद्यालय बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 25 सप्टेंबर 2024 , बुधवार रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्यात .

या स्पर्धेसाठी विविध 14 महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला त्यात 59 पुरुष व 34 महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला. 

    याप्रसंगी आयोजित उद्घाटन समारंभ साठी उद्घाटक म्हणून मा. डॉ.सी .एस. दादा चौधरी, (सचिव मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी) ,तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा.प्रो. डॉ.हेमंत महाजन , जळगाव क्रीडा विभागाचे सचिव डॉ .आनंद उपाध्याय, बोर्ड ऑफ स्टडी चेअरमन डॉ. गोविंद मारतळे , तसेच प्रा. डॉ पी .आर. चौधरी,आंतरराष्ट्रीय  पंच प्रवीण ठाकरे, दीपक ठाकरे  ,तसेच विविध महाविद्यालयातून आलेले संघ व्यवस्थापक, मार्गदर्शक यांची उपस्थिती होती.

  याप्रसंगी डॉ. सी. एस दादा चौधरी यांनी बुद्धिबळ पटावरील सोंगटी चालवून स्पर्धेचे उद्घाटन केले .बुद्धिबळ खेळातून मनाची एकाग्रता ज्ञान, आकलन शक्ती व तर्कशक्तीचा योग्य पद्धतीने विकास होतो आणि म्हणून बुद्धिबळ सारखे खेळ मुलांनी खेळावे यातूनच ग्रँडमास्टर तयार होतील असे मत व्यक्त करून , खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात . प्राचार्य महाजन  यांनी देखील या प्रसंगी   खेळाडूंना शुभेच्छा व मार्गदर्शन केले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा. डॉ. प्रतिभा ढाके यांनी केले.

 या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे विजयी संघ (पुरुष )यु.जी.पी.जी जिमखाना क.ब. चौ. उ. म. वि. जळगाव ,उपविजयी तीन संघ - त्यात जी. एच . रायसोनी कॉलेज जळगाव ,गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग  जळगाव,आर्ट, सायन्स ,कॉमर्स कॉलेज जामनेर.

महिला गटात पी.जी.यु.जी. जिमखाना क. ब. चौ. उ. म. वि. जळगाव -प्रथम , एम.जे. कॉलेज जळगाव- द्वितीय, आर्ट, कॉमर्स, सायन्स कॉलेज जामनेर आणि पी ओ नहाटा भुसावळ या दोघांनी तृतीय क्रमांक मिळविला .

   झालेल्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेतून जळगाव विभाग बुद्धिबळ संघात निवड झालेले खेळाडू  पुढील प्रमाणे पुरुष संघ -सावदेकर अमेय (पी.जी.यु.जी.जिमखाना जळगाव),  गुजराती आयुष (एम जे .कॉलेज ,जळगाव) ठाकूर प्रसाद (पी.जी.यु.जी जिमखाना जळगाव), राजपूत आदित्य (आर्ट्स ,कॉमर्स, सायन्स कॉलेज जामनेर) यादव इंद्रेश (गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज जळगाव)

  महिला संघ-भाटिया रिद्धी (एस मणियार लॉ कॉलेज जळगाव), पाटील पायल (शिरीष चौधरी महाविद्यालय जळगाव) , राणा पायल,शर्मा कांचन (जी. एच. रायसोनी, जळगाव), नागरुत मोहिनी (पी. जी. यु. जी. जिमखाना,जळगाव)

     सदर स्पर्धेच्या आयोजनात महाविद्यालयातील प्रा. एस. एन. पाटील , प्रा.डॉ. संजीव साळवे, प्रा. अभिषेक पाटील ,प्रा डॉ .दीपक बावस्कर , प्रा.राजेश खेडकर यांचे क्रीडा विभागास विशेष सहकार्य मिळाले . स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी देखील परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी पार पडल्यात.

No comments