आगामी सण उत्सव गुण्यागोविंदाने एकोप्याने साजरे करावेत -सपोनि हरीदास बोचरे रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी. (संपादक :- हेमकांत गायकवा...
आगामी सण उत्सव गुण्यागोविंदाने एकोप्याने साजरे करावेत -सपोनि हरीदास बोचरे
रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी.
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील विवरे येथे श्री गो, ग, बेंडाळे हाईस्कूलच्या प्रांगणात शांतता समिती ची बैठक आयोजित करणयात आली होती, आगामी काळात पोळा ईदमिलादुन्नबी, गणेशोत्सव आदि सण असुन गावातील सर्वानी सण उत्सव गुण्यागोविंदाने व एकोप्याने आणि शांततेने हर्षोल्लासात तसेच कायद्याच्या चौकटीत राहून साजरे करावेत असे आवाहन निभोरा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरिक्षक हरीदास बोचरे यांनी उपस्थित शातंता कमिटीच्या बैठकीत केले
या प्रसंगी सरपंच युनुस तडवी, सदस्य युसुफ खाटीक, रफिक सेठ, बिसन सपकाळ, पोलीस पाटील पंकज बेंडाळे, पोपा, योगेश महाजन, जमील शेख, सरदार पिंजारी, पो कॉ, अमोल वाघ विकास पाटील, दिपक गाढे, तसेच विवरे खुर्द विवरे बुद्धक गावातील गणेश मौडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनेतर यावेळी निंभोरा पोलिस स्टेशनचे पिएस आय रा का पाटील कर्मचाऱी गोपनीय शाखेचे अमोल वाघ विजू जावरे रिजवान पि़जारी सुरेश अढायंगे रसीद तडवी शरीफ तडवी आदींची उपस्थिती होती


No comments