adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कृषी विज्ञान केंद्राच्या सातव्या क्षेत्रीय कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्र,पाल संस्थेस उत्कृष्ट कार्य सादरीकरणाचा पुरस्कार प्राप्त.

  कृषी विज्ञान केंद्राच्या  सातव्या क्षेत्रीय कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्र,पाल संस्थेस उत्कृष्ट कार्य सादरीकरणा चा पुरस्कार प्राप्त. रावेर...

 कृषी विज्ञान केंद्राच्या  सातव्या क्षेत्रीय कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्र,पाल संस्थेस उत्कृष्ट कार्य सादरीकरणाचा पुरस्कार प्राप्त.


रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, अटारी कार्यालय,पुणे,झोन -८ व जुनागड कृषी विद्यापीठ, जुनागड (गुजरात)  यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक ४- ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्र,गुजरात व गोवा राज्यातील कृषी विज्ञान केंद्राची सातवी क्षेत्रीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.या प्रसंगी पाल येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा.महेश महाजन यांनी सन २०२३ वर्षाचा कार्य आढावा सादरीकरणाच्या माध्यमातून मांडला.कृषी विज्ञान केंद्राने वर्षभर राबविलेले विविध उपक्रम बाबत सविस्तर माहिती देण्यात आली व  उत्कृष्ट कार्य सादरीकरणासाठी क्षेत्रीय पुरस्काराने मा.डॉ.यु एस गौतम (उप महासंचालक,कृषी,भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली)डॉ.किरण कोकाटे (माजी उप महासंचालक,कृषी),डॉ.एस के रॉय (संचालक, अटारी,पुणे झोन -८),डॉ. व्ही पी चोवडिया (कुलगुरू, जुनागड कृषी विद्यापीठ,जुनागड),डॉ.एम एम अधिकारी(माजी कुलगुरू, मोहांनपुर)डॉ. शाकीर अली (प्रमुख शास्त्रज्ञ, अटारी,पुणे) डॉ. एस के बेरा (संचालक,भुई मूग संशोधन केंद्र,जुनागड )डॉ.एन बी जाधव (विस्तार शिक्षण संचालक,जुनागड कृषी विद्यापीठ, जुनागड) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कृषी विज्ञान केंद्रास प्राप्त झालेल्या पुरस्काराबाबत मा.आ. शिरीषदादा चौधरी,(सातपुडा विकास मंडळ,पाल) मा.अशोक झांबरे (अध्यक्ष,सातपुडा विकास मंडळ,पाल) मा.अजितदादा पाटील(सचिव, सातपुडा विकास मंडळ,पाल) व संचालक मंडळ यांनी केव्हिकेतील शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments