adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कापुस-सोयाबीन भाववाढ, कर्जमाफी व पिकविमा प्रश्नावर अनेक संघटनांचे, पक्षप्रमुख २० सप्टेंबरला संग्रामपुरात होणार दाखल.

  कापुस-सोयाबीन  भाववाढ, कर्जमाफी व पिकविमा प्रश्नावर अनेक संघटनांचे, पक्षप्रमुख २० सप्टेंबरला संग्रामपुरात होणार दाखल. संग्रामपूरात होणारा ...

 कापुस-सोयाबीन भाववाढ, कर्जमाफी व पिकविमा प्रश्नावर अनेक संघटनांचे, पक्षप्रमुख २० सप्टेंबरला संग्रामपुरात होणार दाखल.

संग्रामपूरात होणारा महामेळावा राज्यसरकारला महागात पडणार.प्रशांत डिक्कर.


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

संग्रामपूर/ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नागझरी येथुन काढलेली शिव जनस्वराज्य यात्रा २० सप्टेंबर २०२४ रोजी संग्रामपूरात पोहचणार असुन शेतकरी, शेतमजुर,व महिलांच्या प्रश्नावर तहसिल मैदानावर विराट सभा होणार आहे. कापुस सोयाबीन भाववाढ, कर्जमाफी, पिक विमा, व महिला बचत गटाच्या प्रश्नासह विविध मागण्यांबाबत राज्यभरातील संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे अनेक संघटनांचे पक्षप्रमुख या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना दिली आहे. शेतकरी विरोधी असलेल्या सरकार विरोधात मोठ्या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा या मेळाव्यात होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी सरकारला भाग पाडणार. विमा कंपन्यांचे व सत्ताधाऱ्यांचे साटेलोटे असल्याने शेतकरी पिक विमा पासुन वंचित राहत आहेत. महिला बचत गटाचे करोडो रुपये सरकारने रोखुन धरल्याने राज्यभरातील बचत गटाच्या महिला आक्रमक झाल्या आहेत. अशा विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व राज्यातील अनेक संघटना एकत्रीतपणे लढा देणार आहेत. या मेळाव्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली असून संग्रामपूरात होणारा शेतकऱ्यांचा महामेळावा सरकारला चांगलाच महागात पडणार असल्याचे  स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी खेर्डा बु. येथे पार पडलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना सांगितले. त्यामुळे हा मेळावा ऐतिहासिक होणार. हे विशेष.

No comments