adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेला ईदचा सण हा सामाजिक एैक्‍याचा संदेश देणारा-मा.खासदार.डॉ.सुजय विखे पाटील

  मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेला ईदचा सण हा सामाजिक एैक्‍याचा संदेश देणारा- मा.खासदार.डॉ.सुजय विखे पाटील अहमदनगर (सचिन मोकळ) (संपादक :- ...

 मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेला ईदचा सण हा सामाजिक एैक्‍याचा संदेश देणारा-मा.खासदार.डॉ.सुजय विखे पाटील


अहमदनगर (सचिन मोकळ)

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेला ईदचा सण हा सामाजिक एैक्‍याचा संदेश देणारा आहे. विविधतेतून एकात्‍मता साध्‍य करण्‍यासाठी असे सण उत्‍सव समाजाच्‍या उन्‍नती करीता महत्‍वपूर्ण ठरतात अशा शब्‍दात डॉ.सुजय विखे पाटील यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्‍छा दिल्‍या.डॉ.सुजय विखे यांनी ईदच्या निमित्ताने राहुरी तालुक्यातील कोल्‍हार येथे मुस्लिम बांधवांची भेट घेवून त्‍यांना ईदच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या प्रसंगी बोलताना त्‍यांनी मुस्लिम समाजात ईद सणाला खुप महत्‍व आहे.या पवित्र सणाच्‍या  निमित्‍ताने सामाजिक एकतेचा संदेशही मिळतो.आपला देश हा सर्वधर्म आणि सांस्‍कृतीक परंपरेची एकदा जोपासणारा आहे.या वातावरणा मुळेच समाजातील बंधूभाव टिकून राहण्‍यास मदत होते असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.ईद-ए-मिलादच्या निमित्‍ताने एकत्र येण्याचे आणि विविधतेला स्वीकारण्याचे आवाहन करुन विविध धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेले समुदाय एकत्र येऊन एकत्रित उन्नती साधू शकतात.या संवादाच्या माध्यमातून त्यांनी एकता,सहकार्य,आणि सामाजिक सौहार्द वाढविण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज डॉ.विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

No comments