आगामी सण एकोप्याने सद्भावना सलोख्याने साजरे करा - एसपी महेश्वर रेड्डी रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी (संपादक:-हेमका...
आगामी सण एकोप्याने सद्भावना सलोख्याने साजरे करा - एसपी महेश्वर रेड्डी
रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी
(संपादक:-हेमकांत गायकवाड)
आगामी गणेश उत्सवादरम्यान रावेर शहरातील उदभवणार्या समस्या पोलिस सोडवणार असून, पालिका खड्डे बुजवणार आहे. वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महावितरणने कसोशीने प्रयत्न करावेत. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करावे, गणेश मंडळ भक्तांनी मिरवणूक शांततेत पार पाडावी असे आवाहन डॉ महेश्वर रेड्डी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले एकात्मता टिकवून राहावी जातीय सलोखा अबाधित व सामाजिक सलोखा टिकून राखण्यासाठी रावेर शहरातील कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना सभागृहात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक रावेर पोलीस स्टेशनचे प्रभारी डॉ.विशाल जयस्वाल यांच्या आदेशान्वये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. . यावेळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी बोलत होते. फैजपूर उप अधीक्षक अतिरिक्त एसपी अन्नपूर्णा सिंह यांनीही आपले मनोगत व्यक्त करत गणेशोत्सव ईदुनमिलाद्दूनबी हे सण शांततेच्या आनंदी वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांनी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी रावेर मुख्य कार्यकारी अधिकारी स्वालिया मालगावे, मुख्य महावितरण अधिकारी , नायब तहसीलदार आर. च्या. पाटील, निंभोरा सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, पंचायत समिती रावेर श्री. फेगडे, डॉ.एस. आर. पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष महमूद शेख, डॉ.सुरेश पाटील, अशोक शिंदे, पद्माकर महाजन, डी.डी. वाणी, सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील, गयाशेख, सुरेश पाटील, दिलीप कांबळे, माजी बाजार समिती सभापती नीळकंठ चौधरी व मोठ्या संख्येने अधिकारी, गणेश मंडळ अध्यक्ष, पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटील उपस्थित होते. उपस्थित
रावेर नगरपालिकेतील रस्त्यावरील खड्डे आणि वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून, वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गणेश मिरवणूक कशी काढायची, असा प्रश्न विविध गणेश मंडळांच्या अध्यक्षस्थानी मांडले

No comments