adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पोलिसांच्या अंगावर आरोपी तलवार घेऊन धावल्याने पोलिसांनी झाडल्या तीन गोळ्या म्हाडा कॉलनी मलकापूर येथील घटना

  पोलिसांच्या अंगावर आरोपी तलवार घेऊन धावल्याने पोलिसांनी झाडल्या तीन गोळ्या म्हाडा कॉलनी मलकापूर येथील  घटना बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी...

 पोलिसांच्या अंगावर आरोपी तलवार घेऊन धावल्याने पोलिसांनी झाडल्या तीन गोळ्या म्हाडा कॉलनी मलकापूर येथील  घटना


बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी :-अमोल बावस्कार

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

मलकापूर:- शहर पोलीस स्टेशनला रात्री 10:30 वाजता माहीती मिळाली की,मनोजसींग सिकंदरसींग टाक म्हाडा कॉलनी मलकापुर हा म्हाडा कॉलनी येथे आला असुन त्याचे शेजारी राहणा-या लोकांना मारहाण करीत आहे. सपोनि वर्गे यांनी तात्काळ सदरबाबत वरीष्ठांना माहीती देवुन म्हाडा कॉलनी येथे पोलीस अधिकारी/अंमलदार व इतर पोलीस स्टाफ यांचेसह रवाना झाले. तेथे पोलीसांनी मनोजसींग सिकंदरसीग टाक याचा शोध घेतला


परंतु तो तेथे दिसला नाही. वरुन पोलीस त्याचे पत्नी व आई यांना मनोजसींग बाबत विचारपुस करत असतांना आरोपी मनोजसींग टाक हा बाजुचे झाडाझुडपातुन धावत आला. त्याचे हातात धारदार शस्त्र लोखंडी तलवार होती. व तो धावत येवुन त्याने पोउपनि सुनिल घुसळे यांचेवर तलवारने वार केला. परंतु सदर वार त्यांनी हुकविला त्यानंतर नमुद आरोपी हा इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेवर हल्ला करण्यासाठी धावला. त्यावेळी सपोनि, वर्गे यांनी सोबत असलेले शस्त्रधारी पोकॉ. शुभम ठाकरे यांना पोलीसांचा जिव वाचविण्याच दृष्टीने त्यास हवेत फायर करणेबाबत सांगीतले.

म्हणुन दोन गोळया फायर केल्या. तथापी आरोपी नामे मनोजसींग टाक हा आणखी चवताळून पोलीसांचे मागे तलवार घेवुन धावला म्हणुन सपोनि. वर्गे यांनी आरोपीचे दिशेने फायर करण्यास सांगीतले वरुन पोकॉ. शुभम ठाकरे यांनी तीसरा फायर आरोपीचे दिशेने केला. परंतु आरोपीने सदरचा वार चुकवुन अंधराचा फायदा घेवुन आरोपी बाजुचे झाडाझुडपात पसार झाला. त्यानंतर घटनास्थळी म्हाडा कॉलनी येथे आम्ही व श्री. देवराम गवळी उपविपोअसा मलकापुर असे आरसीपी पथकासह येवुन फरार आरोपीचा शोध घेतला परंतु नमुद आरोपी हा मिळुन आला नाही. आरोपी नामे हा मनोजसींग टाक हा पोलीस स्टेशन मलकापुर शहर येथील कुख्यात आरोपी असुन त्याचेवर पोस्टे मलकापुर शहर येथे मालमत्ता चोरीचे, शरीरीविरुध्दचे तसेच शस्त्र अधिनियम अन्वये बरेच गुन्हे दाखल आहेत. व नमुद आरोपी 08 गुन्हयामध्ये पोहीजे आरोपी (Wanted) आहे. नमुद आरोपी विरुध्द 05 ते 06 जिल्हयांमध्ये विवध कलमांखाली गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोउपनि सुनिल घुसळे यांचे लेखी रिपोर्ट वरुन नमुद आरोपीविरुध्द अप नं. 434/2024 कलम 109, 132, 125, 121 (1), 231 BNS सह कलम 4,25 आर्म अॅक्ट. 3,25 अॅक्ट प्रमाणे पोस्टे मलकापुर शहर यथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्हयात नव्यानेच रुजु झालेले पोलीस अधिक्षक मा.श्री.विश्व पानसरे साहेब यांनी आज दिनांक 01/09/2024 रोजी सकाळी सदरच्या घटनास्थळी भेट दिली. व नमुद फरार आरोपीचा शोध व गुन्हयाचे तपासाबाबत मार्गदर्शन केले. आरोपी शोध करीता विशेष पथके नेमण्यात आले असुन आरोपी शोध सुरु आहे.

No comments