शिरपूर मुस्लिम खाटीक समाजातर्फे नवापूर येथील रुकसाना बी यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा द्यावी म्हणून निवेदन शिरपूर प्रतिनिधी (संपादक:-ह...
शिरपूर मुस्लिम खाटीक समाजातर्फे नवापूर येथील रुकसाना बी यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा द्यावी म्हणून निवेदन
शिरपूर प्रतिनिधी
(संपादक:-हेमकांत गायकवाड)
शिरपूर: शिरपूर तालुका व शिरपूर शहर मुस्लिम खाटीक समाजातर्फे प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक यांना नवापूर येथील रुकसाना बी यांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या सासुरवाडीच्या कुटुंबाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात आले. नवापूर येथील रुकसाना बी यांच्या त्यांच्या सासरवाडीच्या मंडळींनी आर्थिक ,शारीरिक व मानसिक शोषण केले. तिच्या दीर तौसीफ छोटू खाटीक व त्याच्या साथीदार संतोष बाला गावित यांनी कुटुंबाच्या इतर सदस्यांच्या मदतीने रुकसाना बी यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर खुनाचे पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाला एका मोठ्या पोत्यात बंद करून मेलेल्या कोंबड्या फेकत असलेल्या खड्ड्यात फेकण्यात आले. या हत्येत मृत रुकसाना बी यांच्या पती, सासू सासरे नणंद आणि नंदोई यांच्याही सहभाग होता.
शिरपूर खाटीक समाजातर्फे या अमानवीय घटनेच्या निषेध नोंदविण्यात आला. शिरपूर तालुका प्रांताधिकारी व शहर पोलीस निरीक्षक यांना शिरपूर शहर व तालुक्याच्या खाटीक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी नवापूर येथील तौसीफ छोटू खाटीक व कुटुंबाच्या सर्व सदस्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी धुळे जिल्हा खाटीक समाज अध्यक्ष सलीम दादा पहलवान, शिरपूर तालुका मुस्लिम खाटीक समाज अध्यक्ष गयास जालम खाटीक, शिरपूर शहर मुस्लिम खाटीक समाज अध्यक्ष महेमूद खाटीक, माजी अध्यक्ष सादिक खाटीक,अल्लाउद्दीन सर, लईक सर, आसिफ सर, फरहदुल्ला सर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments