अंकलेश्वर- बुऱ्हाणपूर रस्त्याची परिस्थिती बिकट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग बेफिकीर रावेर प्रतिनिधी मुब...
अंकलेश्वर- बुऱ्हाणपूर रस्त्याची परिस्थिती बिकट
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग बेफिकीर
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी.
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गावर फैजपूर सावदा, विवरा, रावेर ते चोरवड महाराष्ट्र मध्य प्रदेश चेकपोस्ट नाका तर मोठा वाघोदा चिनावल फाटा ते निंभोरा रस्ता १ किलोमीटर या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून पावसाळ्यात वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज न समजत नसल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे या दरम्यान महामार्गावर अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्याने.
न्हई राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने महामार्गावरील खड्डे माती मिश्रित मुरुम टाकत बुजवून मलमपट्टी करून रस्त्यांची दुरुस्ती केली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने मोठा निधी खर्च करून खड्डे बुजवले होते.मात्र पावसाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य होते आहे आणि पाऊस थांबल्यानंतर पुन्हा रस्त्यावर नुसतीच धूळ उडते आहे आणि पुन्हा खड्डे जसेच्या तसे पडलेले आहेत असा प्रकार आहे.
सरकारने खर्च केलेला काही पैसा पावसाचे पाण्यात तर काही चिखलात वाहून गेला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये माती मुरूम खडी ऐवजी खडी कछ डांबर वापरून डांबरीकरणाने, खड्डे बुजविण्यात यावे अशी वाहन चालकांसह नागरिकांमधून मागणी होत आहे.


No comments